टीम इंडिया (Photo Credit: Getty Images)

Team India Pink-Ball Test: ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर टीम इंडिया (Team India) आता पुन्हा एकदा पिंक-बॉल टेस्ट सामन्यासाठी मैदानावर उतरण्यास सज्ज आहे. अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर (Motera Stadium) इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ (Indian Team) पहिल्यांदा गुलाबी चेंडूने कसोटी (Pink-Ball Test) सामना खेळणार आहे. दोन्ही संघात चार सामन्यांची मालिका सुरु असून सध्या प्रत्येकी 1-1 सामना जिंकून मालिका बरोबरीत आहे. गुलाबी चेंडूने भारतात खेळवणाला जाणारा हा दुसरा कसोटी सामना असेल. यामध्ये सर्वांच्या नजरा फलंदाजांवर असतील. चेन्नईत खेळल्या गेलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात टीम इंडियासाठी रोहित शर्माने शतक ठोकले तर दुसऱ्या डावात आर अश्विनच्या फलंदाजासह सनसनाटी शतकी खेळी केली होती. दिवस/रात्र कसोटी सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) हा सर्वात यशस्वी भारतीय फलंदाज ठरला आहे. भारतीय कर्णधार या फॉरमॅटमध्ये शंभरी पार करणारा पहिला आणि एकमेव टीम इंडिया फलंदाज आहे. (IND vs AUS 3rd Test 2021: कोहलीच्या निशाण्यावर MS Dhoni याचा 'विराट' कॅप्टन्सी रेकॉर्ड, इतिहास निर्मितीपासून फक्त एक पाऊल दूर)

बांग्लादेशविरुद्ध भारतीय संघाने पहिल्यांदा पिंक-बॉल टेस्ट सामन्याचा अनुभव घेतला होता. कोलकाताच्या ईडन गार्डनवर शानदार शतक ठोकले होते. त्यानंतर, ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या डावात त्याने 180 चेंडूत 74 धावा केल्या. विशेष म्हणजे, कोलकातामध्ये बांग्लादेशविरुद्ध कसोटी सामन्यानंतर कोहलीने एकही कसोटी शतक ठोकलेले नाही. त्यामुळे, सरदार पटेल स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात तरी विराट आपल्या शतकांचा दुष्काळ संपुष्टात आणेल की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दुसरीकडे, इशांत शर्मा आणि उमेश यादवने गुलाबी बॉल टेस्टमध्ये प्रत्येकी पाच गडी बाद केले होते. इशांतने त्या सामन्यात 9 विकेट्स, तर उमेशने एकूण 8 विकेट्स घेतल्या होत्या. पिंक-बॉल कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर बांग्लादेश आणि ऑस्ट्रेलियानंतर त्यांचा हा तिसरा सामना असेल. बांग्ला टायगर्सविरुद्ध संघाने सहज विजय मिळवला तर कांगारू संघाविरुद्ध टीम इंडियाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते.

मागील वर्षी भारतीय संघाने परदेशात, अ‍ॅडिलेड येथे, पहिला दिवस/रात्र सामना खेळला होता. कसोटीत विराट कोहलीच्या संघाने पहिल्या डावात आघाडी घेतली असली तरी, दुसरा डाव 36 धावांवर गडगडला आणि त्यांना 8 विकेटने मोठा पराभव पत्करावा लागला.