IND vs ENG 2nd Test: इंग्लंडविरुद्ध (England) चेन्नई येथे दुसऱ्या टेस्ट सामन्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) कंबर कसली आहे. विराटने नुकतंच आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर काही फोटो शेअर केले ज्यात टीम इंडिया (Team India) कर्णधार नेटमध्ये घाम गळताना दिसत आहे. विराटने बॅटिंग आणि फिल्डिंग सराव करतानाचे आपले फोटो शेअर केले. चेन्नई (Chennai) येथे इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात 227 धावांनी यजमान भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला होता. अशास्थितीत, पाहुण्या इंग्लंडने चार सामन्यांच्या मालिकेत 0-1 अशी आघाडी घेतली आणि आता संघ सिरीजमध्ये विजयी आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असताना भारतीय संघ पूर्ण ताकदीने इंग्लिश टीमला टक्कर देण्याच्या तयारीला लागले आहेत. 13 फेब्रुवारीपासून मालिकेच्या दुसऱ्या सामन्याला सुरुवात होईल. (IND vs ENG 2nd Test 2021: दुसऱ्या चेन्नई टेस्टसाठी ‘या’ घातक खेळाडूला इंग्लिश टीम देऊ शकते विश्रांती, टीम इंडियासाठी ठरला होता त्रासदायक)
"काम चालू आहे," असं लिहीत विराटने सोशल मीडियावर फोटो शेअर केला. चेन्नईत इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात कोहलीने आपला फॉर्म दाखवला आणि 72 धावा फटकावल्या. पण त्याच्या प्रयत्नांनंतरही भारत पहिला सामना वाचवण्यात अपयशी ठरला. भारताचा कर्णधार दुसर्या कसोटी सामन्यात पुनरागमन करेल, आणि पहिल्या सामन्याच्या शेवटच्या दिवशी त्याने खेळलेला डाव पाहून कोहली आपल्या शतकांचा दुष्काळ संपवेल असा अनेकांना विश्वास आहे. विराटने अखेर बांग्लादेशविरुद्ध 2019 मध्ये अखेर शतकी धावसंख्या गाठली होती. चेपॉक स्टेडियमवर एक शतक करताच कोहली अनेक विश्वविक्रमांना गवसणी घालेल. विराटचे कर्णधार म्हणून 41वे तर आंतरराष्ट्रीय करिअरमधील 70वे शतक असेल.
The work goes on 👊👊 pic.twitter.com/3AHPP0dpvN
— Virat Kohli (@imVkohli) February 12, 2021
दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी अष्टपैलू गोलंदाज अक्षर पटेल गुडघेदुखीपासून पूर्णपणे बारा झाला आहे आणि आता तो चेन्नईत शनिवारपासून सुरू होणाऱ्या दुसर्या कसोटी सामन्यासाठी निवडसाठी उपलब्ध आहे. चेन्नईत पहिला सामना बंद दरवाजाच्या मागे खेळला गेल्यानंतर दुसऱ्या सामन्यात प्रेक्षकांच्या उपस्थितीला परवानगी मिळाली आहे. दुसऱ्या चेन्नई टेस्टसाठी स्टेडियममध्ये 50 टक्क्यांपर्यंत प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे.