IND vs ENG 2nd Test: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया लॉर्ड्सच्या विजयाचा ध्वज उभारणार? पाहा रोहित शर्माची रिअक्शन (Watch Video)
रोहित शर्मा (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs ENG 2nd Test 2021: इंग्लंडविरुद्ध (England) नॉटिंगहमच्या ट्रेंट ब्रिज येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पावसामुळे विजयाची सुवर्णसंधी गमावल्यानंतर टीम इंडिया  (Team India) लॉर्ड्सवर (Lords) दुसरा सामना जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरला आहे. 12 ऑगस्टपासून लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू झालेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या दिवशी पहिले फलंदाजी करताना टीम इंडियाने 3 गडी गमावून 276 धावा करत आपली स्थिती मजबूत केली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुलच्या (KL Rahul) सलामी जोडीने लॉर्ड्स कसोटीत भारताला मजबूत पकड मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 127 धावा केल्यावर राहुल अजूनही क्रिजवर नाबाद खेळत आहे, तर रोहितने 145 चेंडूत 83 धावांचे योगदान दिले आणि राहुलसोबत पहिल्या विकेटसाठी 126 धावांची भागीदारी केली. (IND vs ENG 2nd Test Day 1: इंग्लंड विरोधात KL Rahul ने ठोकले खणखणीत शतक, लॉर्ड्सवर शतक झळकावणारा बनला दहावा भारतीय फलंदाज)

भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला जाणारा दुसरा कसोटी सामना 12 ते 16 ऑगस्ट दरम्यान खेळला जाणार आहे. लक्षात घेण्यासारखे आहे की या दरम्यान, 15 ऑगस्ट म्हणजेच भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाईल. पहिल्या दिवसाच्या समाप्तीनंतर पत्रकार परिषदेदरम्यान, 15 ऑगस्ट रोजी (सामन्याच्या चौथ्या दिवशी) भारताने सामना जिंकला तर ते अधिक खास होईल असे विचारले असताना त्याने सलाम केला आणि म्हणाला, “जर असे झाले तर ही एक मोठी गोष्ट असेल.” चाहत्यांना भारतीय सलामीवीराचे हे उत्तर आवडले आणि सर्वांनी सोशल मीडियावर रोहितचे कौतुक केले. लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघ तीनशे धावसंख्येच्या नजीक पोहचला होता.

दरम्यान, रोहित शर्माने 145 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 83 धावा केल्या, जी परदेशातील कसोटी क्रिकेटमधील त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तथापि, त्याने केएल राहुलचे कौतुक केले आणि म्हणाला, “केएल राहुलची सर्वोत्तम कामगिरी होती की मी त्याला  खेळताना पाहिले, तो पहिल्या चेंडूपासून दिवसाच्या शेवटपर्यंत नियंत्रणात होता. तो गोंधळलेला नव्हता किंवा जास्त विचार करत नव्हता. होता - तो होता राहुलचा दिवस होता.” केएल राहुल बराच काळानंतर कसोटी क्रिकेट खेळत आहे.