
IND vs ENG 2nd Test: इंग्लंडचा (England) वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनने (Ollie Robinson) दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) बाद करण्यास कारकीर्दीतील सर्वात मोठी विकेट असल्याचे म्हटले असून, त्याच्याविरुद्ध चौथ्या-पाचव्या स्टंप लाईनवर गोलंदाजी करण्याची त्याची योजना यशस्वी ठरली असे म्हटले. ट्रेंट ब्रिजवर मालिकेच्या पहिल्या कसोटीत पाच विकेट्स घेणाऱ्या रॉबिन्सनने कोहलीला लॉर्ड्स कसोटीच्या (Lords Test) पहिल्या डावात 42 धावांवर जो रूटने स्लिपवर झेलबाद करून पॅव्हिलियनमध्ये पाठवले. कोहलीची विकेट घेतल्यानंतर सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना रॉबिन्सन म्हणाला, “विराटची विकेट माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठी विकेट होती. म्हणूनच मी आनंदी होतो. तो एक मोठा क्षण होता. त्याच्याविरुद्ध आमची योजना चौथ्या-पाचव्या स्टंप लाईनवर बॅक-ऑफ-द-लेंथ गोलंदाजी करण्याची होती. सुदैवाने ही योजना यशस्वी झाली.” (IND vs ENG 2nd Test: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया लॉर्ड्सच्या विजयाचा ध्वज उभारणार? पाहा रोहित शर्माची रिअक्शन)
लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी केएल राहुलच्या नाबाद 127 धावा आणि रोहित शर्माच्या 83 आकर्षक अर्धशतधावांच्या की खेळीने भारताने गुरुवारी पहिल्या दिवशी तीन बाद 276 धावा केल्या होत्या. रॉबिन्सनने टीम इंडियाच्या फलंदाजांचे कौतुक केले, परंतु असेही म्हटले की नशीबाने त्याच्या संघाची साथ दिली नाही. तो म्हणाला, “चेंडू बॅटच्या जवळ गेल्यावर सुमारे 10-15 प्रसंग आले. नशीबाने आमची साथ दिली असती तर आम्ही दोन-तीन विकेट घेऊ शकलो असतो.” तो म्हणाला, “मला वाटले की आम्ही चांगली गोलंदाजी केली. आम्ही त्यांच्या फलंदाजां विरोधात कठोर परिश्रम केले, ते चांगल्या फलंदाजीचे श्रेय घेण्यास पात्र आहेत पण प्रामाणिकपणे सांगायचे तर, तो एक दिवस होता जेव्हा चेंडू बॅटच्या काठाला लागत नव्हता.”
सामन्याबद्दल बोलायचे तर नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंड कर्णधार जो रूटने पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाचे सलामीवीर रोहित शर्मा-केएल राहुलने शानदार फलंदाजी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 126 धावांची भागीदारी केली. 83 धावा करून रोहित शर्माला माघारी परतला तर दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला राहुलची 129 धावांची शतकी खेळी संपुष्टात आली. तसेच विराटने 42 धावांचे योगदान दिले.