IND vs ENG 2nd Test 2021: व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine's Day) आदल्या दिवशी रोहित शर्माने (Rohit Sharma) चेन्नईच्या चेपॉक (Chepauk) स्टेडियमवर आपला सर्वोत्तम खेळ करत 7वे कसोटी शतक झळकावले. यादरम्यान, 'हिटमॅन'ची पत्नी रितिका सजदेह (Ritika Sajdeh) स्टँड्समधून त्याला चीअर करताना दिसली. दुसर्या कसोटी सामन्यात फिरकी अनुकूल खेळपट्टीवर यजमान संघाने पहिल्या दिवसाखेर 6 बाद 300 धावांपर्यंत मजल मारली ज्यात रोहितने सर्वाधिक 161 धावांचे योगदान दिले. दरम्यान, रोहितची आयपीएल (IPL) मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) रोहितच्या शतकी खेळीचा आणि व्हॅलेंटाईन डे यांच्यातील एक खास कनेक्शन उघड केलं आहे आणि ते म्हणजे रोहितने व्हॅलेंटाईन डेच्या आदल्या दिवशीआंतरराष्ट्रीय शतक झळकावण्याची ही दुसरी वेळ आहे. 2018 मध्ये रोहितने पोर्ट एलिझाबेथमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध मॅच-विनिंग शतक ठोकले होते. शिवाय, पत्नी रितिका स्टॅन्डमधून चीअर करत असताना रोहितने मोठा डाव खेळण्याची ही पहिली वेळ नाही. तसेच, 2017 मध्ये रोहितने 13 डिसेंबर रोजी आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त श्रीलंकाविरुद्ध द्विशतक शतक ठोकले होते. आणि त्याच वर्षी रोहितने पत्नी रितिकाचा वाढदिवस आणखी खास करत श्रीलंकेविरूद्ध चौथे टी-20 शतकांपैकी एक शतक ठोकले. (IND vs ENG 2nd Test 2021: Rohit Sharma नव्वदीत असताना शतकी खेळी होईपर्यंत त्याची पत्नी Ritika ची भावमुद्रा कॅमेऱ्यात कैद, पहा Video)
चेपॉकच्या कठीण खेळपट्टीवर रोहितने 161 धावा केल्यावर मुंबई इंडियन्सने शनिवारी सोशल मीडियावर खास दिवसाचा योगायोग दर्शवत पोस्ट शेअर केली. शनिवारी 12,000 हून अधिक चाहत्यांनी भरलेल्या एम. ए चिदंबरम स्टेडियमवर उपस्थित असलेल्या रितिकाने रोहितच्या दीडशतकी खेळीचं टाळ्या वाजवत कौतुक केलं. रोहित, फिरकीपटू जॅक लीचच्या गोलंदाजीवर स्वीप शॉट खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला.
208* vs 🇱🇰 - Wedding anniversary gift
118 vs 🇱🇰 - @ritssajdeh's birthday gift
115 vs 🇿🇦 - Valentine's day gift (2018)
161 vs 🏴 - Valentine’s day gift (2021)
Just #Rohika things 💙#OneFamily #MumbaiIndians #INDvENG @ImRo45 @BCCI pic.twitter.com/EqmSnzVmkS
— Mumbai Indians (@mipaltan) February 13, 2021
दरम्यान, इंग्लंड गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत रोहितने भारताच्या पहिल्या दिवसातील निम्म्याहून अधिक धावा केल्या. पहिल्या कसोटीत भारताचा 227 धावांनी पराभव झाल्यानंतर रोहित पहिल्या चेंडूपासून इंग्लंड वेगवान गोलंदाजांचा सामना करण्यासाठी सज्ज दिसला. पहिल्या सत्रात नियमित अंतराने भागीदार गमावले असतानाही रोहितने इंग्लंडच्या गोलंदाजांवर कायमच हल्ला केला आणि लंचच्या अगोदर अर्धशतक झळकवले. भारतीय ओपनरने आपला फॉर्म कायम ठेवत चहा ब्रेक होण्यापूर्वी 7वे कसोटी शतक झळकावले. टी टीनंतर रोहितने आपला दबदबा कायम ठेवला आणि अजिंक्य रहाणेसह 162 धावांची भागीदारी केली.