IND vs ENG 2nd Test 2021: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात चार सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना चेन्नईच्या एम. ए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium) खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, सामन्याची सुरुवात भारतासाठी फारशी चांगली नव्हती. नाणेफेक जिंकून भारताची सुरुवात खराब झाली. दुपारच्या जेवणापूर्वी भारताने तीन गडी गमावले होते मात्र, भारताच्या तीन विकेट्स गमावल्यावरही रोहित शर्मा (Rohit Sharma) दुसर्या टोकाला टिकून राहिला. अजिंक्य रहाणेने रोहितला चांगली साथ देत दीडशे धावांची भागीदारी पूर्ण केली. यादरम्यान, ‘हिटमॅन’ रोहितने आपल्या कसोटी कारकीर्दीचे 7वे शतक झळकावले, तर इंग्लंडविरुद्धचे त्याचे पहिले कसोटी शतक आहे. रोहितने 130 चेंडूत आपले शतक पूर्ण केले, पण 90 धावांपासून शंभरी पार करे पर्यंत स्टेडियममध्ये उपस्थित ‘हिटमॅन’ची पत्नी रितिका सजदेहचे (Ritika Sajdeh) हावभाव सतत बदलताना दिसले. (IND vs ENG 2nd Test 2021: रोहित शर्माचे दणदणीत शतक, अजिंक्य रहाणेने 'या' यादीत मिळवले मानाचे स्थान, Chepauk वर पहिल्या दिवशी बनले हे प्रमुख रेकॉर्ड)
बीसीसीआयने रितिकाच्या बदलत्या भावना आणि रोहितच्या शतकाचा एक व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की रोहितच्या 90 धावा झाल्यावर रितिका नर्व्हस दिसत आहे. चेहरा आणि हावभाव तिची नर्वसनेस स्पष्ट दर्शवत आहे. रोहित शर्माच्या खेळीदरम्यान त्याच्या पत्नीसह असे बर्याचदा झाले असल्याचे पाहिले गेले आहे. पण रोहितचे शतक पूर्ण होताच रितिका उभी राहिली आणि तिने टाळ्यांनी रोहितचे कौतुक केले. या दरम्यान रितिकाच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटले. बीसीसीआय खेळाडूंच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांच्याबरोबर प्रवास करण्यास परवानगी देत असून रोहितची पत्नी व मुलगी समायरा चेन्नईमध्ये आहेत. रितिका स्टेडियममध्ये नियमित भेट देते आणि बर्याचदा त्याच्यासाठी तिला चिअर करताना पहिले गेले आहे. 2017 मध्ये मोहालीमध्ये रोहितने तिसरे वनडे द्विशतक झळकावले असतानाही ती उपस्थित होती. पहा व्हिडिओ:
Applause from the Chepauk crowd 👌
Dressing room on its feet 👏
A congratulatory hug from Ajinkya Rahane 👍
Appreciation from all round for @ImRo45 as he completes a fine hundred in tough conditions. 🙌🙌 @Paytm #INDvENG #TeamIndia
Follow the match 👉 https://t.co/Hr7Zk2kjNC pic.twitter.com/nWmQfH5Xem
— BCCI (@BCCI) February 13, 2021
दरम्यान, आता दिवसाचा खेळ संपला असून टीम इंडियाने तीनशे पार मजल मारली आहे. रोहितने सर्वाधिक 162 धावा आणि अजिंक्य रहाणेने 67 धावांचे योगदान दिले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा रिषभ पंत 33 धावा आणि अक्षर पटेल 5 धावा करून खेळत होते. मोईन अली आणि जॅक लीच यांना प्रत्येकी 2 विकेट मिळाल्या. कव्हर ड्राईव्ह शॉट खेळण्याच्या प्रयत्नात कोहलीला क्लीन-बोल्ड करत मोईनने भारताला सर्वात मोठा धक्का दिला. पुजाराने 58 चेंडूत 2 चौकारांसह 21 धावा केल्या.