इंग्लंड टी-20 क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs ENG T20I 2021: इंग्लंड (England) राष्ट्रीय निवड समितीने गुरुवारी भारतात (India) होणाऱ्या आगामी टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी 16 सदस्यीय खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. भारत दौऱ्यावर दोन्ही संघातील टी-20 मालिका 12 मार्चपासून खेळली जाईल. आगामी टी-20 वर्ल्ड कप लक्षात घेता ही मालिका दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची असेल. विराट कोहलीच्या नेतृत्वातील संघाविरुद्ध उर्वरित कसोटी मालिकेतील सामन्यातून बाहेर पडणारा जोस बटलर (Jos Buttler) संघात परतला आहे. टी -20 मालिकेचे सर्व सामने अहमदाबादमध्ये (Ahmedabad) खेळले जातील. त्यानंतर, यजमान संघाविरुद्ध इंग्लिश टीम तीन सामन्यांची एकदिवसीय देखील मालिका खेळणार आहे. इंग्लंडच्या टी -20 मालिकेसाठी अनुभवी मोईन अली, सॅम कुरन, टॉम कुरन आणि नंबर एक टी-20 फलंदाज डेविड मलान (Dawid Malan) यांना 16 सदस्यीय संघात स्थान देण्यात आले आहे. या खेळाडूंव्यतिरिक्त आदिल राशिद आणि जेसन रॉय देखील भारताविरुद्ध टी-20 मालिकेचा एक भाग आहेत. (India’s Predicted XI For 2nd Test Vs England: भारतीय संघ इंग्लंडला देणार टक्कर; दुसऱ्या कसोटी सामन्यात 'या' 11 खेळाडूंसोबत मैदानात उतरण्याची शक्यता)

भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा नंतर होईल. जॅक बॉल आणि मॅट पार्किन्सन यांची भारताविरुद्ध टी -20 मालिकेसाठी राखीव खेळाडू म्हणून निवड झाली आहे. दरम्यान, इंग्लंड सध्या भारतविरुद्ध कसोटी मालिका खेळत असून मालिकेत त्यांनी 0-1 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेचा दुसरा सामना 13 फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे खेळला जाईल. कसोटी मालिकेनंतर दोन्ही संघांत 5 टी -20 आणि 3 एकदिवसीय सामने खेळले जातील. 26 फेब्रुवारी रोजी इंग्लंडचा टी-20 संघ भारत दौऱ्यासाठी रवाना होईल. इंग्लंडने 27 वर्षीय लियम लिव्हिंग्स्टोनला संधी दिली आहे, जो तीन वर्षांहून अधिक काळानंतर इंग्लिश लाइनमध्ये स्थान मिळवू शकेल.

भारताविरुद्ध इंग्लंड टी-20 संघ

इयन मॉर्गन (कॅप्टन), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलिंग्ज, जोस बटलर, सॅम कुरन, टॉम कुरन, क्रिस जॉर्डन, लियम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रीस टोपली आणि मार्क वुड.

राखीव खेळाडू: जेक बॉल, मॅट पार्किन्सन.