IND vs ENG 2nd T20I 2021 Live Streaming: भारत आणि इंग्लंड संघातील दुसरा टी-20 सामना लाईव्ह कुठे, कधी आणि कसे पाहणार? वाचा सविस्तर
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी- 20 (Photo Credit: PTI)

IND vs ENG 2nd T20I 2021 Live Streaming: नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघ (Indian Team) आज पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात बरोबरी करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरतील. अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर (Motera Stadium) झालेल्या पहिल्या सामन्यात यजमान संघाला त्यांच्या खराब कामगिरीचा फटका बसला आणि 8 धावांनी पराभव पत्करावा लागला. टीम इंडिया आजच्या सामन्यातून आपल्या फलंदाजीत सुधार करण्याच्या प्रयत्नात असेल विशेषतः आघाडीच्या फळीत. रोहित शर्माची अनुपस्थिती संघाला वरच्या फळीत मोठ्या प्रमाणात जाणवली. मात्र, आता दुसऱ्या सामन्यात त्यांना धवन आणि राहुलच्या जोडीकडून मोठी अपेक्षा असेल. अहमदाबाद येथील दुसऱ्या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल तर 6:30 वाजता टॉस होईल. या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्सवर पाहता येतील. शिवाय, Disney+ Hotstar अ‍ॅप आणि वेबसाइटवर चाहते सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात. स्टार स्पोर्ट्स 5 भाषांमध्ये (इंग्रजी, हिंदी, कन्नड, तेलगू आणि तामिळ) सामना लाईव्ह प्रसारित करणार आहे. (Rohit-Rahul-Dhawan Opening Pair Stats: रोहित-राहुल-धवन यांच्यातील कोण आहे टी-20 मधील सर्वोत्तम सलामी जोडीदार? पहा हे धक्कादायक आकडे)

पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याचा भारत पूरेपूर प्रयत्न करेल. टीम इंडियासामना निर्णायक असल्याने या सामन्यातून नेमका डच्चू कुणाला मिळू शकतो आणि कोणाला संधी मिळते याकडे सध्या सगळ्या क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून आहे. दुसरीकडे, इंग्लंड संघ आपली विजयी घोडदौड सुरु ठेवण्याच्या निर्धारात असेल. मागील सामन्यात इंग्लिश टीमने प्रत्येक विभागात चमकदार कामगिरी करत भारतीय संघावर दबाव आणला होता ज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी ते उत्साहित असतील.

भारताचा टी-20 संघ: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी, दीपक चाहर, राहुल तेवतिया आणि ईशान किशन (राखीव विकेटकीपर).

इंग्लंड टी-20 संघ: इयन मॉर्गन (कॅप्टन), जोस बटलर, जेसन रॉय, लियम लिविंगस्टोन, डेविड मलान, बेन स्टोक्स, मोईन अली, आदिल राशिद, रीस टॉपले, क्रिस जॉर्डन, मार्क वुड, सॅम कुरन, टॉम कुरन, सॅम बिलिंग्स, जॉनी बेयरस्टो आणि जोफ्रा आर्चर.