Rohit-Rahul-Dhawan Opening Pair Stats: रोहित-राहुल-धवन यांच्यातील कोण आहे टी-20 मधील सर्वोत्तम सलामी जोडीदार? पहा हे धक्कादायक आकडे

भारतीय संघानेही इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यास सुरुवात केली आहे. टीम इंडियासाठी वर्ल्ड कप पूर्वीची ही शेवटची आंतरराष्ट्रीय टी -20 मालिका असेल. विराट कोहली आणि संघ व्यवस्थापन त्यांच्या महत्त्वपूर्ण खेळाडूंच्या सरावपेक्षा संघ संयोजनाच्या शोधात प्रयोग करण्यात व्यस्त आहेत आणि इंग्लंडविरुद्ध मालिकेच्या पहिल्या सामन्यात याचे मोठे उदाहरण पाहायला मिळाले.

Rohit-Rahul-Dhawan Opening Pair Stats: रोहित-राहुल-धवन यांच्यातील कोण आहे टी-20 मधील सर्वोत्तम सलामी जोडीदार? पहा हे धक्कादायक आकडे
रोहित शर्मा, केएल राहुल आणि शिखर धवन (Photo Credit: Getty)

Rohit-Rahul-Dhawan Opening Pair Stats: आयसीसी टी-20 वर्ल्ड कपच्या (ICC T20I World Cup) आयोजनासाठी आता तब्बल सात महिने शिल्लक आहेत. भारतात (India) होणाऱ्या या जागतिक-स्तरीय स्पर्धेसाठी संघांनी आपली तयारी सुरू केली आहे आणि आपल्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंसह वेगवेगळे स्पर्धा खेळत आहेत. भारतीय संघानेही (Indian Team) इंग्लंडविरुद्ध (England) पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यास सुरुवात केली आहे. टीम इंडियासाठी वर्ल्ड कप पूर्वीची ही शेवटची आंतरराष्ट्रीय टी -20 मालिका असेल. यानंतर त्याचे बहुतेक खेळाडू आयपीएलच्या अंतिम सामन्यांसाठी, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि इंग्लंड दौर्‍याची तयारी करणार आहेत. या स्पर्धांमध्ये संघाचे कोणते सर्व प्रमुख खेळाडू सहभागी होतील हे जवळजवळ निश्चित झाले आहे. तथापि, विराट कोहली (Virat Kohli) आणि संघ व्यवस्थापन त्यांच्या महत्त्वपूर्ण खेळाडूंच्या सरावपेक्षा संघ संयोजनाच्या शोधात प्रयोग करण्यात व्यस्त आहेत आणि इंग्लंडविरुद्ध मालिकेच्या पहिल्या सामन्यात याचे मोठे उदाहरण पाहायला मिळाले. (IND vs ENG T20I 2021: ‘विराट कोहलीसाठीही हा नियम लागू पडतो का?’ Rohit Sharma याला विश्रांती देण्याच्या निर्णयावर Virender Sehwag ने उपस्थित केला प्रश्न)

भारतीय संघाने आपला स्टार ओपनर आणि फॉर्ममध्ये असलेल्या रोहित शर्माला (Rohit Sharma) बाहेर बसवले. रोहितला विश्राम देण्याची बाब चाहत्यांसह कोणीही पचवू शकले नाही. शिवाय, आकडेवारी पाहता रोहित आणि केएल राहुल (KL Rahul) जोडी जास्त चांगली आणि परिणामकारक आहे. रोहित आणि राहुलच्या जोडीने आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत आणि 50.72 च्या सरासरीने 558 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर शिखर धवन (Shikhar Dhawan)-राहुल जोडीने सात सामन्यांत 43 च्या सरासरीने 306 धावा केल्या आहेत. याशिवाय रोहित आणि शिखरच्या सलामी जोडीने आतापर्यंत 52 सामन्यात 33.51 च्या सरासरीने 1743 धावा केल्या आहेत.

दुसरीकडे, या खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीबद्दल बोलायचे तर जुलै 2019 नंतर रोहितने 14 सामन्यांत 34 च्या सरासरीने आणि 144 च्या स्ट्राइक रेटने 442 धावा केल्या आहेत, राहुलने 18 सामन्यात 44 च्या सरासरीने आणि 139 च्या स्ट्राइक रेटने 663 धावा केल्या आहेत आणि धवनने 14 सामन्यात 27 च्या सरासरीने आणि 120 च्या स्ट्राइक रेटने 359 धावा केल्या आहेत. अशास्थितीत, इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात कोणती जोडी सलामीला येते हे पाहणे उत्साहाचे ठरेल.

(The above story first appeared on LatestLY on Mar 13, 2021 06:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).