IND vs ENG 2nd ODI 2021 Live Streaming: इंग्लंड (England) संघासाठी ‘करो या मरो’चा सामना असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडिया (Team India) मालिका खिशात घालण्याच्या उद्देशाने पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (Maharashtra Cricket Association) स्टेडियमवर उतरतील. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघ (Indian Team) संध्या 1-0 अशा आघाडीवर असून दुसऱ्या सामन्यात त्यांच्याकडे मालिका जिंकण्याची सुवर्ण संधी आहे, तर इंग्लिश संघासाठी मालिकेतील आव्हान कायम ठेवण्याचीही अखेरची संधी असेल. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता सुरू होईल तर टॉस सामन्याच्या अर्धातास पूर्वी म्हणजेच दुपारी 1:00 वाजता होईल. भारतीय प्रेक्षकांसाठी सामना टीव्हीवरील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह प्रसारित केला जाईल. शिवाय, ऑनलाईन चाहते Disney+ Hotstar अॅप आणि वेबसाइट व Jio TV वर सामन्याचे लाईव्ह स्ट्रीम पाहू शकतात. (‘जेवढा मोठा धक्का, तेवढं मोठं कमबॅक’! दुखापतग्रस्त Shreyas Iyer ने सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना दिले वचन, पहा Tweet)
जून 2019 नंतर पहिल्यांदाच दोन संघ एकदिवसीय सामन्यात आमने-सामने आले आहेत. यापूर्वी झालेल्या मालिकेच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने 66 धावांनी जोरदार विजय मिळवला होता. मात्र, आजच्या सामन्यात दोन्ही संघ कोणत्या संयोजनासह मैदानात उतरतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यजमान संघात रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांना तर इंग्लिश टीममध्ये कर्णधार इयन मॉर्गन आणि सॅम बिलिंग्स यांना दुखापत झाली होती. श्रेयस अय्यर यापूर्वीच मालिकेतून बाहेर पडला असून अन्य तीन खेळाडूंच्या मालिकेत खेळण्यावर काय निर्णय होतो हे तर नाणेफेक दरम्यानच समोर येईल. दुखापतग्रस्त अय्यरच्या जागी भारतीय टीममध्ये सूर्यकुमार यादवला संधी मिळण्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
पहा भारत-इंग्लंड वनडे संघ
भारताचा एकदिवसीय संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, क्रुणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर.
इंग्लंडचा एकदिवसीय संघ: इयन मॉर्गन (कॅप्टन), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलिंग्ज, जोस बटलर, सॅम कुरन, टॉम कुरन, लियाम लिव्हिंगस्टोन, मॅट पार्किन्सन, आदिल रशीद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रीस टोपली, मार्क वूड.