IND vs ENG 3rd T20I 2021: कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि पदार्पणवीर ईशान किशनच्या (Ishan Kishan) दणदणीत अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने दुसऱ्या अहमदाबाद (Ahmedabad) येथील दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडला (England) 7 विकेटने धूळ चारली. यासह यजमान भारतीय संघाने (Indian Team) पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. आता मालिकेचा तिसरा सामना उद्या, 16 मार्च रोजी याच मैदानावर खेळला जाणार आहे. मात्र, दुसऱ्या सामन्यात यजमान संघाने अष्टपैलू कामगिरी केली असली तरी आगामी तिसऱ्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये एक मोठा बदल करू शकतात. इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन सामन्यात अपयशी ठरलेल्या केएल राहुलला (KL Rahul) तिसऱ्या सामन्यातून बाहेर केले जाऊ शकते तर त्याच्या जागी उपलब्ध असल्यास रोहित शर्माचा (Rohit Sharma) समावेश केला होऊ शकतो. राहुल ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर पहिल्यांदा भारतीय संघाच्या निळ्या जर्सीत दिसत आहे. (IND vs ENG 2nd T20I 2021: नवोदित Ishan Kishan, विराट कोहली यांचा अर्धशतकी तडाखा, टीम इंडियाची मालिकेत 1-1ने बरोबरी)
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर राहुलला काही खास कमाल दाखवता आली नाही. त्याने सिडनीच्या दुसऱ्या वनडे सामन्यात 76 धावा तर कॅनबेरा येथील पहिल्या टी-20 सामन्यात 51 धावांची खेळी केली. त्यानंतर, दुसऱ्या सामन्यात तो 30 धावा करून माघारी परतला. त्यानंतर तो दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी उपलब्ध होऊ शकला नाही. असे असूनही कर्णधार विराट कोहलीने राहुल आणि रोहित शर्माला सलामीसाठी पहिली पसंत म्हटले मात्र, पहिल्या दोन्ही सामन्यात रोहितचा समावेश न करता राहुलला पहिले शिखर धवन आणि दुसऱ्या सामन्यात ईशान किशनसह सलामीला पाठवले. पहिल्या सामन्यात राहुल एकच धाव करू शकला तर दुसऱ्या सामन्यात त्याला भोपळाही फोडता आला नाही. अशास्थितीत, कोहली आणि संघ व्यवस्थापन रोहितला प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यावर विचार करू शकते. शिवाय, ईशान आणि रोहितने यापूर्वी आयपीएल टीम मुंबई इंडियन्सकडूनही एकत्र खेळले असल्यामुळे ते एकमेकांशी चांगले जुळवून घेतली.
यामध्ये भर म्हणजे यापूर्वी कसोटी मालिकेत रोहित शानदार फॉर्ममध्ये होता. त्याने यजमान संघाकडून मालिकेत सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्यामुळे, पहिल्या दोन्ही टी-20 सामन्यातून हिटमॅनच्या अनुपस्थितीने चाहत्यांसह तज्ञांना देखील धक्का बसला आहे ज्यांनी मुंबईकर फलंदाजाच्या कमबॅकची मागणी केली आहे.