IND vs ENG 2021: शुभमन गिलच्या रिप्लेसमेंटवर Sourav Ganguly यांनी सोडले मौन, पाहा काय म्हणाले BCCI अध्यक्ष
शुभमन गिल आणि सौरव गांगुली (Photo Credit: PTI)

IND vs ENG 2021: इंग्लंड दौऱ्यावर (England Tour) आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यादरम्यान भारताचा सलामी फलंदाज शुभमन गिलच्या दुखापतीने (Shubman Gill Injury) नवीन चर्चेला सुरुवात झाली आहे. गिलला दुखापत झाली होती ज्यामुळे त्याला इंग्लंडविरुद्ध  मालिकेमधून (England Series) बाहेर पडण्यास भाग पाडले. श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि देवदत्त पडिक्क्ल (Devdutt Padikkal) यांना इंग्लंड दौर्‍यासाठी पाठवले जाऊ शकते, असे सांगण्यात आले होते पण अधिकृतपणे कोणताही निर्णय झालेला नाही. शॉ आणि पडिक्क्ल सध्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी श्रीलंकेत आहेत आणि इंग्लंडमध्ये रोहित शर्मा, केएल राहुल (KL Rahul), मयंक अग्रवाल, अभिमन्यु ईस्वरन (Abhimanyu Easwaran) यासारखे अनेक सलामी फलंदाज भारताकडे आहेत आणि त्यामुळे संघाला गिलच्या बदली खेळाडूची गरज नाही असे निवड समितीला वाटते. त्यांच्या 49 व्या वाढदिवशी बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि यासंदर्भात एका प्रश्नाला सामोरे गेले. (Team India Selection Controversy: अभिमन्यु ईश्वरनच्या स्थानावरून टीम मॅनेजमेंट-निवडकर्त्यांमध्ये बिनसलं, वादाने करून दिली जुन्या प्रकरणांची आठवण)

इंग्लंडमध्ये दुखापतग्रस्त सलामीवीर शुभमन गिलची बदली न पाठवण्याच्या राष्ट्रीय निवड समितीच्या निर्णयावरून सुरु झालेला वाद बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी गुरुवारी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. वादग्रस्त विषयाबाबत विचारले असता गांगुली म्हणाले: “हा निवड समितीचा निर्णय आहे.” या व्यतिरिक्त, असेही वृत्त समोर आले आहे की बीसीसीआय टीम इंडियाच्या इंग्लंड दौर्‍यासाठीच्या खेळाडूंच्या निवडीवर खूष नाही आहे. टीम मॅनेजमेंट केएल राहुलला सलामीवीर म्हणून वापरू इच्छित नाही, तर ईश्वरन टीमच्या योजनांमध्ये कुठेही बसत नसल्याचे वृत्त समोर आले आहे. नियमित कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात भारत 4 ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेद्वारे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या 2021-23 चक्राची सुरुवात होईल.

दरम्यान, गांगुलीला त्यांच्या तब्येतीविषयी देखील विचारण्यात आले. गांगुलीला यंदा वर्षाच्या सुरुवातीला हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यांनतर त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली असून गांगुली म्हणाले की, ते पूर्णपणे ठीक आहेत. “मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. अजून एक वर्ष निघून गेलं आहे. या कोविड काळात तुम्ही प्रयत्न करा आणि शक्य तितके शांत रहा. हे आपल्यापेक्षा आपल्या आसपासच्या लोकांसाठी आहे. घरातल्या लोकांनी उत्सवाची तयारी केली आहे. बंद दरवाज्याच्या आत उत्सव आहे,” ते म्हणाले.