IND vs ENG 1st Test Day 4: वॉशिंग्टन सुंदरची अफलातून कामगिरी, इंग्लंडविरुद्ध झुंजार अर्धशतकी खेळी करत मिळवले दिग्गजांच्या एलिट यादीत स्थान
वॉशिंग्टन सुंदर (Photo Credit: PTI)

IND vs ENG 1st Test Day 4: वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) आतापर्यंत त्याच्या कसोटी कारकीर्दीची अविस्मरणीय सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेन येथे चौथ्या आणि निर्णायक कसोटी सामन्याच्या भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळताच सुंदरने 84 धावा फटकावल्या. टिम पेनच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियाविरुद्ध संस्मरणीय मालिका विजयात महत्त्वपूर्ण 2 विकेट घेतल्या. रविंद्र जडेजा नसल्यामुळे सुंदरने चेन्नईत (Chennai) इंग्लंडविरुद्ध (England) चार कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या सलामीच्या सामन्यात भारतीय इलेव्हनयामध्ये स्थान मिळवले आणि तिसऱ्या दिवशी शानदार कामगिरी केली. चौथ्या दिवशी टीम इंडियाची (Team India) स्थिती 6 बाद 257 धावा आणि यजमान संघ इंग्लंडच्या 321 धावांनी पिछाडीवर असताना सुंदर कसोटी क्रिकेटमध्ये दुसरे अर्धशतक ठोकले आणि देशात व परदेशात डेब्यूच्या पहिल्या डावात अर्धशतकी धावसंख्या गाठणाऱ्या खेळाडूंच्या एलिट यादीत प्रवेश केला. (IND vs ENG 1st Test Day 4 Lunch: टीम इंडियाची शानदार सुरुवात, अश्विनचा पहिल्याच चेंडूवर इंग्लंडला दणका)

सुंदरपूर्वी परदेशीत आणि मायदेशात कसोटी पदार्पणात असे दोन्ही सामन्यात पहिल्या डावात अर्धशतक ठोकणाऱ्या फलंदाजांच्या या यादीत रुसी मोदी, एस अमरनाथ, अरुण लाल, माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सुरेश रैना, हार्दिक पांड्या आणि मयंक अग्रवाल यांनी स्थान पटकावले आहे. सुंदरने बरीच एकाग्रतेने फलंदाजी केली आहे आणि इंग्लंडच्या फिरकीपटू डोम बेस आणि जॅक लीचच्याविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी केली. तसेच जोफ्रा आर्चर आणि जेम्स अँडरसनच्या अतिरिक्त वेगवान गोलंदाजीपुढे सहजतेने भारताची धावसंख्या पुढे नेट सातव्या विकेटसाठी रविचंद्रन अश्विनसह अर्धशतकी भागीदारी केली. इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात सुंदरला एकही विकेट मिळाली नाही, ज्याची कसर त्याने बॅटने भरून काढली. चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रापूर्वी टीम इंडिया पहिल्या डावात 337 धावांवर ऑलआऊट झाली आणि इंग्लंडला 241 धावांची आघाडी मिळाली.

भारताकडून पहिल्या डावात चेतेश्वर पुजाराने 73 तर रिषभ पंतने 91 धावांची खेळी केली. इंग्लंडसाठी डॉम बेसने सर्वाधिक 4 गडी बाद केले तर जोफ्रा आर्चर, जेम्स अँडरसन आणि जॅक लीच यांना प्रत्येकी 2 विकेट मिळाल्या.