IND vs ENG 1st T20 Live Streaming: भारत (India) दौऱ्यावरील निराशाजनक कसोटी मालिकेनंतर इयन मॉर्गनच्या (Eoin Morgan) नेतृत्वात इंग्लंड (England) संघ, शुक्रवार 12 मार्च रोजी पाच कसोटी सामन्यांच्या टी-20 मालिकेच्या पहिल्या सामन्यात यजमान भारतीय संघाविरुद्ध मैदानात उतरतील. अहमदाबाद (Ahmedabad) येथील जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मालिकेचे सर्व पाच सामने खेळले जाणार आहेत. अलिकडच्या काळात दोन संघांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय टी-20 कामगिरीमध्ये भयानक सातत्य राखले आहे. आयसीसी टी-20 क्रमवारीत इंग्लंड अव्वल स्थानावर आहे, तर कोहली अँड कंपनी त्यांच्या मागे दुसर्या क्रमांकावर आहेत. अशास्थितीत, दोन्ही संघातील ही मालिका नक्कीच चुरशीची ठरणार असेल. भारत विरुद्ध इंग्लंड पहिला टी-20 सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल. सामना टीव्हीवरील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह प्रसारित केला जाईल तर Disney+ Hotstar अॅप आणि वेबसाइटवर चाहते सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात. स्टार स्पोर्ट्स 5 भाषांमध्ये (इंग्रजी, हिंदी, कन्नड, तेलगू आणि तामिळ) सामना लाईव्ह प्रसारित करणार आहे. (IND vs ENG Series: बुमराहच्या ‘या’ रेकॉर्डपासून युजवेंद्र चहल फक्त एक पाऊल दूर, सूर्यकुमार यादव इतिहासाच्या उंबरठ्यावर, इंग्लंड T20 मालिकेत बनू शकतात हे प्रमुख रेकॉर्ड)
यंदा वर्षा अखेरीस आयसीसी टी-20 वर्ल्ड कप भारतात आयोजित होणार असल्याने मालिकेतील सर्व विभागांमध्ये क्लिनिकल प्रदर्शन करण्याचे दोन्ही संघ प्रयत्नात असेल. तथापि, टीम इंडिया रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यासारख्या त्यांच्या काही प्रमुख खेळाडूंशिवाय मॉर्गनच्या इंग्लिश टीमविरुद्ध मैदानात उतरेल. दुसरीकडे, इंग्लंड कर्णधार मॉर्गनने सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले की अलीकडील फॉर्म आणि घरच्या परिचित परिस्थितीमुळे त्यांचे प्रतिस्पर्धी मालिका जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार असतील. एकूणच, पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना चाहत्यांसाठी नक्कीच मनोरंजक ठरेल.
भारताचा टी-20 संघ: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी, दीपक चाहर, राहुल तेवतिया आणि ईशान किशन (राखीव विकेटकीपर).
इंग्लंड टी-20 संघ: इयन मॉर्गन (कॅप्टन), जोस बटलर, जेसन रॉय, लियम लिविंगस्टोन, डेविड मलान, बेन स्टोक्स, मोईन अली, आदिल राशिद, रीस टॉपले, क्रिस जॉर्डन, मार्क वुड, सॅम कुरन, टॉम कुरन, सॅम बिलिंग्स, जॉनी बेयरस्टो आणि जोफ्रा आर्चर.