IND vs BAN T20 Schedule: टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा आणि अंतिम सामना कानपूर येथे खेळवण्यात येत आहे. त्यानंतर उभयसंघात 3 सामन्याची टी 20 मालिका (IND vs BAN T20 Match) होणार आहे. बीसीसीआयने 28 सप्टेंबर रोजी या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला. 6 ऑक्टोबर पासून उभय संघात सामने होणार आहेत. सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर मयंक यादव याला पहिल्यांदाच संधी दिली गेली आहे. बीसीसीआयनंतर आता काल बांगलादेश क्रिकेट बोर्डाने टी 20 सीरिजसाठी संघ जाहीर केला आहे.
त्यामुळे दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात आलेल्या बांगलादेश संघाला पुन्हा एकदा टी 20 सामन्यांसाठी भारतात याव लागणार आहे. ग्वाल्हेर, दिल्ली आणि हैदराबाद येथे तीन टी 20 सामने होणार आहेत. ग्वाल्हेरमध्ये पहिला टी 20 सामना 6 ऑक्टोबर रोजी, त्यानंतर दुसरा 9 ऑक्टोबर रोजी दिल्लीत आणि तिसरा सामना 12 ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्ये पार पडेल. (हेही वाचा: IND vs BAN 2nd Test Day 5 Live Streaming: कानपूर कसोटी रोमांचक स्थितीत, आज सामन्याचा शेवटचा दिवस; 'इथं' पाहा लाइव्ह)
टी 20 मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना - 6 ऑक्टोबर 2024 - भारत विरुद्ध बांगलादेश - न्यू माधवराव सिंधिया स्टेडियम, ग्वाल्हेर
दुसरा सामना - 9 ऑक्टोबर 2024 - भारत विरुद्ध बांगलादेश - अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
तिसरा सामना - 12 ऑक्टोबर 2024 - भारत विरुद्ध बांगलादेश -राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद
टी 20 मालिकेसाठी संघ आणि खेळाडू
भारत संघ : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (विकेटकीपर), अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि मयंक यादव.
बांगलादेश संघ : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), लिटन दास, मेहदी हसन मिराज, तस्कीन अहमद, तंजीद हसन, परवेज होसैन इमोन, तॉहीद हृदॉय, झाकेर अली, महेदी हसन, रिशाद होसैन, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम, तंजीम हसन साकिब, रकीबुल हसन आणि महमुदुल्लाह.