भारत विरुद्ध बांगलादेश (Photo Credit - File)

India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team Match Scorecard: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (India National Cricket Team) विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. हा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. आज सामन्याचा शेवटचा दिवस आहे. या सामन्याच्या पहिल्या तीन दिवसात केवळ 35 षटके खेळली गेली. अशा स्थितीत सामन्याचा निकाल लागण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात होते, मात्र चौथ्या दिवशी अतिशय रोमांचक सामना झाला, त्यामुळे सामना विजय-पराभवाने संपुष्टात येईल असे दिसते.

रोमांचक सामना होण्याची शक्यता

आज सामन्याच्या पाचव्या दिवशी भारत आणि बांगलादेश यांच्यात रोमांचक सामना होण्याची शक्यता आहे. बांगलादेशने पहिल्या डावात 233 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 285/9 धावांवर डाव घोषित केला. बांगलादेशने दुसऱ्या डावात 26 धावांत 2 विकेट गमावल्या आहेत. (हे देखील वाचा: IND vs BAN 2nd Test: तीन दिवसांचा खेळ वाया, तरीही भारतीय संघ जिंकू शकतो कानपूर कसोटी? समजून घ्या समीकरण)

कुठे पाहणार सामना?

चाहत्यानां या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर उपलब्ध असेल. त्याचवेळी चाहत्यांना जिओ सिनेमा ॲप, फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर या सामन्याचा आनंद घेता येईल. याशिवाय आगामी मालिकेची प्रत्येक क्षणाची माहिती तुम्ही Latestly Marathi च्या वेबसाइटवर पाहू शकता.