भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) संघातील दुसरा टी-20 सामना उद्या राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (Saurashtra Cricket Association) स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या मॅचमध्ये उतरताच कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) टीम इंडियाकडून एक ऐतिहासिक कामगिरी करण्याची नोंद करण्याची संधी आहे. उद्या बांग्लादेशविरुद्ध दुसरा टी-20 सामना रोहितचा करिअरमधील 100 वा सामना असेल. आणि यासह तो माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) याच्यानंतर 100 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळणारा दुसरा क्रिकेटपटू ठरेल, तर पहिला भारतीय असेल. भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना रविवारी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळला गेला, यात बांग्लादेश संघाने सात गडी राखून विजय मिळविला. या विजयासह बांग्लादेशने पहिल्यांदा भारताला टी-20 सामन्यात पराभूत केले आहेत. (IND vs BAN 2nd T20I: प्रदूषणानंतर भारत-बांग्लादेश मॅचवर आता 'Maha' Cyclone चे सावट, सामना रद्द होण्याची शक्यता)
दिल्लीतील सामना खेळत रोहितने माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याला मागे टाकले होते. धोनीने आजवर 98 टी-20 सामने खेळले आहेत. 99 टी-20 मॅचसह रोहित सध्या माजी पाकिस्तानी कर्णधार शाहिद आफ्रिदी यांची बरोबरी साधली. माजी पाकिस्तानी अष्टपैलू शोएब मलिक याने सर्वाधिक 111 टी -20 सामने खेळले आहेत. या फॉर्मेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा शोएब जगातील एकमेव खेळाडू आहे. या मालिकेत नियमित कर्णधार विराट कोहली याला विश्रांती देण्यात आल्याने रोहितवर संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रोहितने 19 सप्टेंबर 2007 रोजी डर्बनमधील इंग्लंडविरुद्ध सामन्यासह टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 32 वर्षीय रोहितने 99 टी -20 मॅचमध्ये 2452 धावा केल्या आहेत आणि या प्रकारात सर्वाधिक धावा करणारा तो अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याने कोहलीला9 धावांनी मागे टाकले. कोहलीने 72 सामन्यात 2450 धावा केल्या आहेत आणि तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.
मुशफिकुर रहीम याच्या नाबाद अर्धशतकामुळे बांग्लादेशने भारताविरुद्ध टी-20 सामन्यात पहिल्या विजयाची नोंद केली. टॉस जिंकून बांग्लादेशने पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय घेत भारतीय फलंदाजांना 148 धावांवर रोखले. याच्या प्रत्युत्तरात बांग्लादेशने सहजतेने लक्ष्य पूर्ण केले.