IND vs BAN: पत्रकार परिषदेत रोहित शर्मा भडकला, 'या' कारणामुळे पत्रकाराला फटकारले, पाहा Video
Rohit Sharma (Photo Credit: PTI)

टीम इंडिया आणि बांग्लादेश (Bangladesh) संघात आज राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दुसरा टी-20 सामना खेळला जाणार आहे. या मॅचपूर्वी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने परिषदेतपत्रकारांशी बोलला. यावेळी नेहमी शांत आणि मजेदार अशा प्रतिक्रिया देणारा भारताचा अव्वल क्रमांकाचा फलंदाजाने स्वतः वरचा ताबा गमावला आणि आणि रागाच्या भरात पत्रकाराला ऐकवले. बांग्लादेशविरुद्ध दुसरा सामन्यात विजय मिळवणे भारतीय संघासाठी अत्यावश्यक आहे. दिल्लीतील पहिल्या सामन्यात बांग्लादेशने 7 विकेटने विजय मिळवत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली होती. मागील विजय बांग्लादेशचा भारतविरुद्ध टी-20 मधील पहिला विजय होता/ त्यामुळे भारतीय संघाला या मालिकेत आव्हान कायम ठेवण्यासाठी आजचा सामान जिंकणे गरजेचे आहे. (IND vs BAN 2nd T20I: रोहित शर्मा नोंदवणार टी-20 शतक, 'ही' ऐतिहासिक कामगिरी करणारा बनणार पहिला भारतीय पुरुष क्रिकेटपटू)

दरम्यान, या मॅचपूर्वी पत्रकार परिषदेत दुसर्‍या टी-20 सामन्याबद्दल बोलत असताना एका रिपोर्टरचा फोन वाजला, यावर रोहित चिडला आणि त्याने फोन सायलेंट मोडवर ठेवण्यास सांगितले. एका प्रश्नाला उत्तर देताना रोहित टी-20 मध्ये नवीन खेळाडूंचा उपयोग कसा करावा हे सांगण्याचा प्रयत्न करीत होता, तेव्हा ही घटना घडली. यावर उत्तर देताना रोहित म्हणाला, "कृपया, तुमचा फोन सायलेंटवर ठेवा, बॉस." पाहा या प्रसंगाचा हा व्हिडिओ:

परिषदेत रोहित म्हणाला की, वनडे आणि कसोटी सामन्यांसाठी अनेक नवीन खेळाडू तयार करण्याचा भारत प्रयत्न करीत आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत बांग्लादेशविरुद्ध तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत संघाचे नेतृत्व सांभाळणारा रोहित म्हणाला की, युवा खेळाडूंना वाढण्याची आणि शिकण्याची गरज आहे. टीम इंडियाला त्यांची बेंच ताकद प्लेइंग संघाइतकी मजबूत व्हावी अशी इच्छा आहे. या दरम्यान रोहितने राजकोटच्या खेळपट्टीवरही चर्चा केली आणि तो म्हणाला की, फलंदाजासाठी ते खूप चांगले आहे. फलंदाजीच्या बाबतीत राजकोटची पीच नेहमीच चांगली राहिली आहे, तसेच गोलंदाजांनाही यावर बारिश मदत मिळेल.