![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/11/IND-vs-BAN-1st-T20I-380x214.jpg)
भारत (India) आणि बांग्लादेश (Banglades) संघातील 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. आजचा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळला जात आहे. आजच्या मॅचमध्ये टॉस जिंकून बांग्लादेश संघाचा कर्णधार महमूदुल्लाह याने पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही संघात 2009 पासून 8 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने झाले आहेत. यातील सर्व सामन्यात भारताने विजयाची नोंद केली आहे. त्यामुळे, यंदाच्या दौऱ्यावर बांग्लादेशी संघ जुनी समीकरणे बदलण्याच्या प्रयत्नात असतील. आजच्या मॅचसह अष्टपैलू शिवम दुबे (Shivam Dubey) याने भारताकडून टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहेत. तर रिषभ पंत यालाही विकेटकीपर म्हणून संघात स्थान देण्यात आले आहेत. या मालिकेत विराट कोहली याला विश्रांती देण्यात आली आहे. दिल्लीत हा सामना होण्यापूर्वी शहराच्या हवेची गुणवत्ता सर्वात धोकादायक पातळीवर पोहोचली होती. त्यामुळे हा सामना होईल की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. (IND vs BAN 1st T20I Live Score Updates: बांग्लादेश संघ अरुण जेटली स्टेडियममध्ये दाखल)
यापूर्वी भारतीय संघाने घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकाविरूद्ध टी-20 मालिका खेळली होती जी 1-1 ने ड्रॉ राहिली होती. त्यामुळे, यंदाच्या मालिकेत भारत जिंकण्याचा प्रयत्न करेल. कोहलीच्या अनुपस्थितीत संघाची फलंदाजी रोहित आणि त्याचा साथीदार शिखर धवन याच्यावर अवलंबून असेल. या दोघांवर बरेच काही अवलंबून आहे कारण संघाची मधली फळी अनुभवी नाही आहे त्यामुळे संघाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी या दोन्ही फलंदाजांवर असेल.
भारतीय संघ: रोहित शर्मा (कॅप्टन), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (विकेटकीपर), क्रुणाल पंड्या, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, दीपक चहर आणि खलील अहमद.
बांगलादेश संघ: सौम्या सरकार, लिंटन दास, मोहम्मद नईम, मुश्फिकुर रहीम (यष्टीरक्षक), महमुदुल्ला (कर्णधार), मोसद्देक हुसेन, आफिफ हुसेन, मोसद्देक हुसैन, अमीनुल इस्लाम, सैफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान आणि अल-अमीन-हुसेन.