बांग्लादेश संघाने टीम इंडियाविरुद्ध पहिल्या टी-20 मॅचमध्ये 7 विकेटने विजय मिळवला आहे. भारतीय संघाविरुद्ध बांग्लादेशचा टी-20 मधील हा पहिला विजय आहे.मुशफिकुर रहीमयाने संघासाठी सर्वाधिक 60 धावा केल्या.
BAN 154/3 in 19.3 Overs (Target 148/6) | IND vs BAN 1st T20I Live Score Updates: बांगलादेशचा टीम इंडियावर 7 विकेट्सने ऐतिहासिक विजय
भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणारा पहिला टी-20 सामना लवकरच सुरु होणार आहे. पण, वायू प्रदूषणामुळे (Air Pollution) जर दृश्यमानता आणि श्वास घेण्यात त्रास होत असल्यास सामना रद्द केला जाऊ शकतो. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना आज संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. सध्या बांग्लादेशी संघ अरुण जेटली स्टेडियममध्ये दाखल झाला आहे. दोन्ही संघाने मागील काही दिवसांपासून या मैदानावर प्रदूषणासह सराव केला आहे पण, बंळदेस संघाचे खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी मुखवटे परिधान करून सराव करताना दिसले. अशा परिस्थितीत आज मॅच खेळली जाणार की नाही हे लवकरच जाहीर होईल. (पहा भारत-बांग्लादेश संघातील पहिल्या टी-20 मॅचचं Live Score इथे)
2009 पासून या दोन आशियाई देशांमध्ये टी-20 सामने खेळले जात आहेत. भारत आणि बांग्लादेशमध्ये आतापर्यंत एकूण 8 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत, ज्यात भारतीय संघाने सर्व जिंकले आहेत. बांग्लादेश संघाला एकही सामन्यात विजय मिळवता आला नाही. त्यामुळे यंदाच्या मालिकेत बांग्लादेशी संधी जुनी समीकरणं बदलण्याच्या प्रयत्नात असतील. असे काही प्रसंग होते जेव्हा बांगलादेश संघ विजयाच्या मार्गावर होता, परंतु भारतीय खेळाडूंनी असे होऊ दिले नाही.
बांग्लादेशविरूद्ध टी-20 मालिकेसाठी भारताची टीमः रोहित शर्मा (कॅप्टन), शिखर धवन, केएल राहुल, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, क्रुणाल पंड्या, युजवेंद्र चहल, राहुल चहर, दीपक चहर, खलील अहमद, शिवम दुबे आणि शार्दुल ठाकूर.