IND vs AUS 1st ODI: विराट कोहली याने नेट्समध्ये जसप्रीत बुमराह याला सामोरे जाण्याचा शेअर केला मजेदार अनुभव, पाहा (Video)
जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली (Photo Credit: Getty Images)

भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Team) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा जगातील प्रथम क्रमांकाचा वनडे फलंदाज आहे तर जसप्रीत बुमराह (Virat Kohli) प्रथम क्रमांकाचा गोलंदाज आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर प्रेक्षक एकमेकांसमोर खेळताना दिसत नाहीत. पण नेट प्रॅक्टिस दरम्यान हे दोन्ही खेळाडू आमने-सामने येतात. ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध वनडे मालिका सुरू होण्यापूर्वी कोहलीने नेट प्रॅक्टिसची एक मजेदार कहाणी शेअर केली. दुखापतीतून पुनरागमन करीत बुमराहने श्रीलंकेविरुद्ध शानदार प्रदर्शन केले. पण आता ऑस्ट्रेलियाच्या रूपात त्याच्यासमोर मोठे आव्हान आहे. कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया 14 जानेवारीला 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना मुंबईत खेळेल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेआधी नेट प्रॅक्टिस दरम्यान कोहलीने बुमराहचा सामना केला. या सराव सत्राबद्दल कोहलीने बुमराहच्या चेंडूवर चौकार मारण्याचा त्याचा अनुभव शेअर केला. (IND vs AUS: रोहित शर्मा, शिखर धवन आणि केएल राहुल यांचा होऊ शकतो Playing XI मध्ये समावेश, वाचा सविस्तर)

"असं अनेकदा होत नाही की आपण जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर चौकार मारू शकाल." कोहलीने मुंबईत पत्रकारांना सांगितले की, "ही एक अतिशय मजेदार स्पर्धा आहे. तो माझ्या म्हणण्यानुसार सर्वात कुशल गोलंदाज आहे आणि त्याच्याविरुद्ध खेळण्यासाठी मी नेटवर तीव्रता आणतो,” कोहलीने मुंबईत पत्रकारांना सांगितले. तो पुढे म्हणाले, “मी तुम्हाला खात्री देतो की तो डोक्यावर किंवा आपल्या फास्यांना टार्गेट करण्यात अजिबात लाजत नाही." बीसीसीआयने कोहलीचा बुमराहबद्दल अनुभव शेअर करतानाचा व्हिडिओही शेअर केला आहे. पाहा:

श्रीलंकाविरुद्ध टी-20 मालिका जिंकत भारताने विजयाने नवीन वर्षाची सुरुवात केली होती, पण आता टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियाचे कडवे आव्हान असेल. कोहली म्हणाला की भारत आणि ऑस्ट्रेलिया हे जगातील दोन चांगले संघ आहेत आणि ऑस्ट्रेलियाविरूद्ध मैदानावर उतरण्यासाठी संघ अधिक उत्साही आहे. एकीकडे टीम इंडिया विजय रथावर स्वार आहे, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघाने शेवटच्या अनेक सामन्यांपासून पराभवाचा आस्वाद घेतलेलंना नाही.