
भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना मंगळवारी मुंबईत खेळला जाईल. या सामन्याआधी विराट कोहली (Virat Kohli) एका कोंडीत अडकला होता, कि अखेरीस शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि केएल राहुल (KL Rahul) यांच्यापैकी कोणाला संधी द्यावी. परंतु या सामन्यापूर्वीच त्याने ही समस्या सोडविली आहे. मुंबईत (Mumbai) ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या सामन्यापूर्वी कोहलीने पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे की या सामन्यात या तिन्ही खेळाडूंना संधी देऊन फलंदाजीचा क्रम बदलण्याचीही शक्यता आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या टी -20 सामन्यात कोहलीने युवा फलंदाज संजू सॅमसन याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवत स्वतः सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येत फलंदाजांचा क्रम बदलला होता. आंतरराष्ट्रीय टी-20 कारकीर्दीत विराट दुसऱ्यांदा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. या सामन्यात तो 26 धावांवर बाद झाला. (IND vs AUS ODI 2020: रोहित शर्मा-शिखर धवन यांच्या जोडीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेत विशेष विक्रम नोंदवण्याची संधी)
कोहली मी कोठे खेळतो याबद्दलचा मालक नाही आणि टीमला मदत झाल्यास तो स्वतःचा क्रमही बदलण्यास तयार आहे. “पाहा, फॉर्ममधील एखादा खेळाडू संघासाठी नेहमीच चांगला असतो. आपल्याला उत्कृष्ट खेळाडू उपलब्ध असावेत आणि नंतर संघासाठी कोणते संयोजन असावे हे निवडले पाहिजे. तिन्ही (रोहित, शिखर आणि राहुल) खेळण्याची शक्यता आहे,"कोहली मुंबईत पत्रकारांना म्हणाला. सामन्याच्या आदल्या दिवशी म्हणाला की, “मैदानावर आम्हाला कोणता संतुलन घ्यायचा आहे हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.” खालच्या क्रमांकावर फलंदाजी करण्यात त्याला आनंद होईल का असे विचारले असता विराट म्हणाला, “हो, मोठी शक्यता आहे. असे केल्याने मला खूप आनंद होईल."
मंगळवारी होणाऱ्या सामन्यात कोहली तिसर्या क्रमांकावर फलंदाजीस आला नाही तर केएल राहुल त्याच्या जागी येऊन टीम इंडिया रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी डावाची सुरुवात करण्याची अपेक्षा करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुलने दणदणीत कामगिरी केली आहे. दुसरीकडे धवनही दुखापतीतून परतला असून ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे, अशा परिस्थितीत कोहलीने सर्व गोष्टी डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतल्याचा समजले जात आहे.