गेल्या दोन वर्षांत वनडे क्रिकेटमध्ये भारताचे (India) वर्चस्व गाजवण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांच्या पहिल्या तीन खेळाडूंनी केलेल्या धावा. टीम इंडियासाठी रोहित शर्मा (Rohit Sharma), शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी सातत्याने केलेली कामगिरी भारताच्या यशामागील सर्वात मोठे कारण आहे. ऑस्ट्रेलियासाठी त्यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी राखून ठेवली आहे. 2013 पासून रोहित, धवन आणि कोहली या तिघांनी मिळून एकूण 58 टक्के धावा केल्या आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया (Australia) पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर आमने-सामने येणार आहे. ही मालिका 14 जानेवारीपासून मुंबईत सुरू होईल. दुसरा सामना 17 जानेवारीला राजकोट तर तिसरा वनडे 19 जानेवारीला बेंगलुरूमध्ये खेळला जाईल. या मालिकेत टीम इंडियाची सलामीची जोडी रोहित-धवनला वनडेमध्ये एक खास विक्रम नोंदवण्याची संधी मिळणार आहे. (India Here We Come! डेविड वॉर्नर याने टीम इंडियाविरुद्ध वनडे मालिकेआधी भारतीय चाहत्यांसाठी दिला खास संदेश)
रोहित आणि धवनने जर पहिल्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारी केली तर कोणत्याही विशिष्ट संघाविरुद्ध ही भारताची सर्वात यशस्वी जोडी बनेल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 22 डावांमध्ये रोहित आणि धवनने सहा शतकी भागीदारी केली आणि गॉर्डन ग्रीनिज आणि डेसमॉन्ड हेन्स यांची (भारताविरुद्ध 22 डावात 6 शतकांची भागीदारी) बरोबरी केली आहे. याशिवाय, धवन आणि रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16, तिसरी सर्वाधिक शतकी भागीदारी केली आहे. सौरव गांगुली आणि सौरव गांगुली यांच्यामध्ये वनडेत 26, तर विराट आणि रोहितमध्ये 17 शतकी भागीदारी झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1 शतकी भागीदारी केल्यास रोहित-धवनची जोडी रोहित-विराटच्या शतकी जोडीची बरोबरी करेल, तर 1 पेक्षा अधिक शतकी भागीदारी केल्यास त्यांना मागे टाकत भारतासाठी दुसरी सर्वाधिक शतकी भागीदारीची नोंद करेल.
दुसरीकडे, या मालिकेत विराट सेनेला विशेष विक्रम करण्याची संधी असेल. जर भारतीय संघाने (Indian Team) ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकली तर घरच्या मैदानावर 200 आंतरराष्ट्रीय सामने जिंकणारा हा जगातील दुसरा संघ बनेल. या प्रकरणात कांगारूंचा संघ आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाने आजवर देशात खेळत एकूण 280 सामने जिंकले आहेत.