India Here We Come! डेविड वॉर्नर याने टीम इंडियाविरुद्ध वनडे मालिकेआधी भारतीय चाहत्यांसाठी दिला खास संदेश
डेविड वॉर्नर (Photo Credit: Getty Images)

डेविड वॉर्नर (David Warner) याची खूप मोठी फॅन फॉलोइंग आहे आणि हे आश्चर्यकारक नाही. इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मधील त्याच्या धमाकेदार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाच्या (Australia) या सुपरस्टारने क्रिकेटप्रेमी देशात त्याचा एक मोठे चाहता वर्ग निर्माण केला आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स) पासून करिअर सुरू केल्यानंतर तो सनरायझर्स हैदराबाद संघात गेले आणि त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. एका वर्षाच्या बंदीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलेल्या वॉर्नरने विश्वचषकपासून मर्यादित षटकार आणि टेस्ट क्रिकेटमधील त्याच्या खेळीने सर्वांना प्रभावित केले आहे. आणि आता वॉर्नर ऑस्ट्रेलिया संघासोबत भारत दौऱ्यावर येण्यास रवाना झाला आहे. 14 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारत (India) ऑस्ट्रेलियाचे यजमानपद भुषवेल. आणि या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज वॉर्नरने भारतीय चाहत्यांसाठी खास संदेश सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Australia Tour Of India 2020: टीम इंडियाविरुद्ध वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर, 'या' प्रभावी खेळाडूंचा झाला समावेश)

भारत दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी वॉर्नरने इंस्टाग्राम एका सेल्फी पोस्ट पोस्ट केली आणि कॅप्शनमध्ये लिहिले की तो भारतीय चाहत्यांना पाहण्यास उत्सुक आहेत. "आम्ही येतोय भारत!! ही एक उत्कृष्ट 3 सामन्यांची मालिका होणार आहे. भारतीय चाहत्यांना भेटण्यासाठी उत्सुक आहे," असे वॉर्नरने लिहिले. आगामी मालिका ब्लॉकबस्टर असल्याची चिन्ह दिसत आहे. ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स, मार्नस लाबूशेन आणि आरोन फिंच यांच्यासारख्या खेळाडूंनी भरलेला सामर्थ्यवान संघ जाहीर केला आहे. दुसरीकडे, भारताकडे विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि अन्य खेळाडू कांगारूच्या आव्हानाला सामोरे जातील.

 

View this post on Instagram

 

India here we come!! It’s going to be a great 3 game series. Looking forward to seeing all our Indian fans 👍👍

A post shared by David Warner (@davidwarner31) on

वॉर्नरचा होम सीजन चांगला सिद्ध झाला आणि भारतातदेखील हा फॉर्म कायम ठेवण्यास वॉर्नर उत्सुक असेल. त्याने श्रीलंकाविरुद्ध टी-20 सामन्यात पहिले शतक ठोकले. आणि नंतर टेस्ट,मध्ये 131 च्या सरासरीने 5 सामन्यात 786 धावा केल्या. वॉर्नरने पाकिस्तानविरुद्ध कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट नाबाद 335 धावांसह तीन शतकं ठोकली.