(Photo Credits: IANS)

India Tour of Australia 2020-21: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील क्रिकेट मालिकेचा इतिहास खूप जुना आहे आणि दोन्ही संघांच्या खेळाडूंनी आजवर बर्‍याच विक्रमांची नोंद केली आहे. दोन्ही संघात एकापेक्षा जास्त अनुभवी खेळाडू आहेत आणि त्यांनी खेळलेला डाव आजही चाहत्यांच्या स्मरणात आहे. टीम इंडियाचे दोन फलंदाज सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंह (Yuvraj Singh) यांनी देखील कांगारू संघाविरुद्ध कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात शानदार विक्रम नोंदवला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध डाऊन अंडर खेळत सचिनच्या वर्चस्वाला आजवर कोणीही मात देऊ शकलेला नाही. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक मारण्याचा विक्रम मास्टर-ब्लास्टरच्या नावावर आहे, तर वनडेमध्ये भारताचा माजी षटकार किंग म्हणून ओळखला जाणारा युवराज सर्वात युवा वयात ऑस्ट्रेलियामध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक (Youngest Indian To Score ODI Ton in Australia) करणारा फलंदाज आहे. (IND vs AUS Series: बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'या' 3 टीम इंडिया फलंदाजांनी खेळली आहे अविस्मरणीय खेळी, जे भारतीय चाहते कधीही विसरू शकणार नाहीत)

2004 च्या भारताच्या डाऊन अंडर दौऱ्यावर युवराजने हा अतूट विक्रम नोंदवला आहे. युवराजने वयाच्या 22 वर्ष आणि 41 दिवशी ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक झळकावले आणि भारताकडून शतक ठोकणारा सर्वात युवा फलंदाज बनला होता. युवराजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे कारकीर्दीत एकूण 41 सामने खेळले ज्यात त्याने 27.25 च्या सरासरीने एकूण 981 धावा केल्या. या दरम्यान त्याने 2 शतके आणि 4 अर्धशतकही झळकावली आणि कांगारू संघाविरुद्ध वनडेमधील त्याची सर्वोत्तम धावसंख्या 139 आहे. दुसरीकडे, सचिन एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे आणि त्याने 71 सामन्यांत 3077 धावा केल्या आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना 27 नोव्हेंबर रोजी सिडनी येथे खेळला जाणार आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने सिडनी तर तिसरा सामना कॅनबेराच्या मनुका ओव्हल येथे खेळला जाईल. एकदिवसीय मालिकेनंतर दोन्ही संघात तीन सामन्यांची टी-20 आणि नंतर 17 डिसेंबरपासून चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल.