IND vs AUS Series: बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'या' 3 टीम इंडिया फलंदाजांनी खेळली आहे अविस्मरणीय खेळी, जे भारतीय चाहते कधीही विसरू शकणार नाहीत
आरोन फिंच आणि विराट कोहली (Photo Credit: Getty)

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (India Tour of Australia) आहे. दोन्ही संघात 27 नोव्हेंबरपासून मर्यादित ओव्हरच्या मालिकांपासून दौऱ्याची सुरुवात होईल. डाऊन अंडर दौऱ्यावर भारतीय संघ (Indian Team) तीन वनडे, तीन टी-20 आणि चार कसोटी सामने खेळणार आहे. भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Autralia) यांच्यात आजवर अनेक संस्मणीय वनडे सामने अनुभवायला मिळाले आहेत. त्याहून खेळाडूंनी देखील ऑस्ट्रेलियामध्ये वनडे सामन्यांमध्ये प्रभावी कामगिरी बजावली आहे. पण, एकूण आकडेवारी पाहता ऑस्ट्रेलियन संघ नेहमीच भारतीय संघाच्या वरचढ राहिला आहे. दोन्ही उभय संघात आजवर 140 वनडे सामने खेळले गेले आहेत त्यापैकी ऑस्ट्रेलियाने 78 तर भारताने 52 सामन्यात विजय मिळवला आहे. शिवाय, ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यात टीम इंडियाची स्थिती अजूनही गंभीर आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध डाऊन अंडर (Indian Team in Australia) 51 वनडे सामने खेळले असून त्यांना फक्त 13 सामन्यात विजय मिळवला आला आहे. (IND vs AUS 2020-21: ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सामन्यात Down Under 'या' 5 भारतीयांनी केल्या आहेत सर्वाधिक धावा, विराट कोहलीही यादीत सामील)

असे असूनही काही भारतीय फलंदाजांनी मात्र अविस्मरणीय खेळी केली आहे जे भारतीय चाहत्यांना विसरणे मुश्किल आहे. आज आपण त्यापैकी टॉप-3 डावांबद्दल जाणून घेणार आहोत...

1. रोहित शर्मा 171, पहिला वनडे, पर्थ 2016

टीम इंडियाच्या 2016 ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हिटमॅन' रोहित शर्माने पर्थ येथे शानदार खेळी केली. भारताचे टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि रोहितने संपूर्ण 50 ओव्हर खेळत तो योग्य ठरवला. रोहितने 163 चेंडूत 171 धावांचा जबरदस्त डाव खेळला. या दरम्यान सलामीवीरने 13 चौकार लगावले आणि तब्बल सात षटकार मारले. शिवाय, रोहितने तिसऱ्या विकेटसाठी विराट कोहलीसोबत 207 धावांची भागीदारी केली. विराटने 97 चेंडूत 91 धावा केल्या होत्या.

2. युवराज सिंह 139, विबी सिरीज

युवराज सिंहने 2000 मध्ये नैरोबी येथे झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुध्द 84 धावांचा डाव खेळत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या आगमनाची घोषणा केली. त्यानंतर 2004 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये विबी सिरीजच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात महत्तवपूर्ण डाव खेळला. भारताने 80 धावांवर मुख्य फलंदाज गमावले असताना युवीने व्हीव्हीस लक्ष्मणसह भागीदारी करत टीमला सामन्यात पुनरागमन करून दिले. युवराजने ब्रेट ली आणि जेसन गिलेस्पी सारख्या दिग्गज गोलंदाजांची धुलाई केली आणि 122 चेंडूंचा सामना करत 139 धावा केल्या.

3. सचिन तेंडुलकर 117, सीबी सिरीज फायनल 2008

सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियामधील एका भारतीय खेळाडूने केलेली एकदिवसीय सर्वोत्तम खेळी खेळली. मार्च 2008 च्या सीबी सिरीज फायनलमध्ये भारतासमोर विजयासाठी 240 धावांचे आव्हान होते. टीमचे तीन फलंदाज तंबूत परतले होते, मात्र सचिन एका बाजूने लढा देत राहिला आणि 120 चेंडूत नाबाद 117 धावांचा विजयी डाव खेळला. या दरम्यान, युवा रोहित शर्माने 87 चेंडूत 66 धावा करत मास्टर-ब्लास्टरला चांगली साथ दिली. यासह भारताने 6 विकेटने सामना जिंकला आणि दुसरी फायनल जिंकत, पहिल्यांदा टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात मालिका विजयाचा मान मिळवला.

दरम्यान, यंदाच्या ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित ओव्हरच्या दौऱ्याला रोहित शर्मा मुकणार असल्याने शिखर धवन, केएल राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांना फलंदाजी विभागात अतिरिक्त जबाबदारी स्विकारावी लागणार असेल. भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने नेहमीच वर्चस्व गाजवले असल्याने भारतीय संघाला विजयासाठी नक्कीच संघर्ष करावा लागणार आहे.