IND vs AUS 4th Test Day 4: ब्रिस्बेन टेस्टमध्ये रोहित शर्मा याच्याकडून स्टिव्ह स्मिथच्या डर्टी गेमची पुनरावृत्ती? पहा Video
रोहित शर्माची शॅडो बॅटिंग (Photo Credit: Twitter/midhulcric)

IND vs AUS 4th Test Day 4: ऑस्ट्रेलिया (Australia) आणि टीम इंडिया (Team India) यांच्यात चौथ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) टेस्ट सामन्यातील चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. कांगारू गोलंदाजांचा घाम काढत टीम इंडियाने तिसऱ्या दिवशी सामन्यात आव्हान कायम ठेवलं आणि मॅचमध्ये रंगात आणली. ब्रिस्बेनच्या गब्बा (Gabba) येथे सामन्याचा चौथ्या दिवसाचा खेळ सुरु असून पहिल्या सत्रात असे काही पाहायला मिळाले जेणेकरून सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कांगारू संघाच्या दुसऱ्या डावात लंच ब्रेकपूर्वी ओव्हरच्या नंतर फिल्डिंग बदलत असताना रोहित शर्मा (Rohit Sharma) ऑस्ट्रेलियन खेळाडू खेळपट्टीवर असताना क्रिजवर आला आणि बॅटिंगची अ‍ॅक्शन केली ते पाहून कमेंटरी करणारे भारतीय भारतीय भाष्यकार संजय मांजरेकर यांनी (Steve Smith) स्टिव्ह स्मिथ प्रमाणेच रोहित फलंदाजाचे क्रिजवरील बॅटिंग मार्क पुसण्याचा आरोप केला. मांजरेकर यांच्या टिप्पणीवर यूजर्स भडकले. योगायोग म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजास सिडनीतील (Sydney) तिसर्‍या कसोटी सामन्यात खेळपट्टीवर जाऊन क्रिजवरील भारतीय फलंदाजाचे बॅटिंग मार्क पायाने पुसताना दिसत होता. (IND vs AUS 4th Test Day 4: मोहम्मद सिराजचे एकाच ओव्हरमध्ये 2 धक्के; लंचपर्यंत ऑस्ट्रेलियाचा स्कोर 149/4, टीम इंडियावर 182 धावांची आघाडी)

रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा फलंदाजी करत असताना स्मिथला क्रिजवरील बॅटिंग मार्क पुसतानाही एका व्हायरल व्हिडिओमध्ये पहिले गेले. या व्हिडिओमध्ये 49 नंबरची जर्सी घातलेला खेळाडू भारतीय फलंदाजांचा बॅटिंग मार्क पुसताना दिसला. ऑस्ट्रेलियन संघात 49 क्रमांकाची जर्सी स्मिथ वापरतो. यानंतर यूजर्सकडून माजी ऑस्ट्रेलियन कर्णधाराच्या खेळाडूवृत्तीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. दरम्यान, ब्रिस्बेनमध्ये चौथ्या दिवशी दुपारच्या जेवणाच्या वेळी भारतीय क्रिकेटर रोहितही असेच करताना दिसला असे मांजरेकर यांनी कमेंट्री करताना म्हटले तर दुसऱ्या टोकाने स्मिथने ओव्हर दरम्यान त्याच्याकडे पाहत होता. रोहितने हे ऑस्ट्रेलियन फलंदाजाला चिडवण्यासाठी केलं का हे तर वेळच सांगेल. पहा हा व्हिडिओ:

दुसरीकडे, मांजरेकर यांच्या टिप्पणीवर यूजर्स मात्र संतापले आणि वेगवेळ्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर येऊ लागल्या.

रोहित स्मिथसारखं करत आहे!

मांजरेकर पुन्हा फुटेज पहा!

संजय तुम्ही खरोखर निवृत्ती जाहीर करा!

रोहित-स्मिथची तुलना

ऑस्ट्रेलियाबद्दलची निष्ठा!

रोहितची शॅडो बॅटिंग

दरम्यान, दुसऱ्या डावात कांगारू संघाचे चार फलंदाज माघारी परतले असून स्मिथ सेट होऊन खेळत आहे. स्मिथ आणि ग्रीनवर आता संघाला मोठी आघाडी मिळवून देण्याची जबाबदारी आहे.