IND vs AUS 4th Test 2021: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) टेस्ट सिरीजचा अंतिम सामना जिंकण्यासाठी यजमान ऑस्ट्रेलिया (Australia) संघाने टीम इंडियापुढे (Team India) 328 धावांचं विशाल आव्हान दिलं आहे. सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या अंतिम सत्रात पावसाने दोनदा पावसाने व्यत्यय आणला. पाचव्या दिवशीही पाऊस सामन्यात अढथळा आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशास्थितीत, सामन्याच्या अंतिम दिवशी दोन्ही संघाकडे विजयासाठी प्रयत्न करण्यासाठी अंतिम संधी आहे. 4 सामन्यांची बॉर्डर-गावस्कर टेस्ट मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. चौथा सामना जिंकणारा संघ मालिका देखील खिशात घालेल. मात्र, साधारणपणे मालिका बरोबरीत राहिल्यास दोन्हा संघांच्या कर्णधारांना देण्यात येते. पण, बॉर्डर-गावसकर मालिकेबाबत नियम जरा वेगळे आहेत. मालिका बरोबरीत राहिल्यास याआधीच्या मालिका विजयी संघ कोणता हे पाहिलं जातं, मालिकेतील दोन्ही संघांची कामगिरी पाहिलीही जाते. त्यानुसार, गत मालिकेत विजयी ठरलेल्या संघाला ही ट्रॉफी देण्यात येते. (IND vs AUS 4th Test Day 4: ब्रिस्बेनच्या अंतिम सत्रात पावसाची बॅटिंग, चौथ्या दिवसाखेर टीम इंडियाला विजयासाठी आणखी 324 धावांची गरज)
त्यामुळे, मालिका बरोबरीत राहिल्यास टीम इंडियाकडे ट्रॉफी कायम राहील कारण त्यांनी 2018-19 मधील 4 सामन्यांच्या मालिकेत कांगारु संघाचा 2-1 असा पराभव केला होता. शिवाय, मालिका विजयाची टीम इंडिया हॅटट्रिकही करेल. टीम इंडियाने यापूर्वी 2016-17मध्ये भारतात आयोजित आणि 2018-19 मध्ये डाऊन अंडर आयोजित 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने विजय मिळवला होता. त्यामुळे, अंतिम दिवशी टीम इंडिया हॅटट्रिक करते की कांगारू संघ बाजी मारतं हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे. लक्षात घेण्यासारखे म्हणजे मालिका बरोबरीत सुटण्याचीही दुसरीच वेळ ठरू शकते. 1996-97 मध्ये पहिल्यांदा बोर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेचे आयोजन केले होते. त्यानंतर 2003-04 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित केलेल्या चार सामन्यांच्या सिरीजमध्ये दोन्ही संघाने प्रत्येकी 1 सामने जिंकले होते तर 2 सामने अनिर्णीत राहिले होते.
दुसरीकडे, सध्याच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबूशेनने सर्वाधिक 426 तर भारताकडून कर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 244 धावा केल्या आहेत. सर्वाधिक विकेट घेण्यात देखील कांगारू संघाचे गोलंदाज आघाडीवर आहे. आतापर्यंत पॅट कमिन्सने 17 तर जोश हेझलवूडने 16 गडी बाद केले आहेत.