इशांत शर्मा (Photo credit : youtube)

IND vs AUS 3rd Test 2021: भारतीय वेगवान गोलंदाज इशांत शर्मा (Ishant Sharma) बुधवारपासून इंग्लंडविरुद्ध (England) सुरु होणाऱ्या मालिकेच्या तिसर्‍या कसोटी सामन्यात देशासाठी आपला 100वा कसोटी सामना खेळणार आहे. भारत (India) आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीत असून दोन्ही संघ मोटेरा स्टेडियमवर (Motera Stadium) झालेल्या गुलाबी बॉल टेस्टमध्ये (Pink-Ball Test) आमने-सामने येतील. इशांत आपला 100वा सामना खेळणार आहे, तर मालिकेदरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये 300 कसोटी विकेटचा टप्पा गाठला. एकूणच हा पराक्रम करणारा तो सहावा भारतीय ठरला. “जर तुमची कारकीर्द 14 वर्षे लांब असेल आणि तुम्ही अद्याप खेळत असाल तर तुम्ही फक्त एका ठळक गोष्टीचे नाव देऊ शकत नाही. फक्त एक हायलाइट करणे कठीण आहे, प्रत्येक क्रीडापटूचा आलेख वर-खाली जात असतो. माझा आलेख ज्याने उंचावला किंवा खाली आणला त्या एका गोष्टीबद्दल मी म्हणू शकत नाही.” 32 वर्षीय इशांतला या सामन्यात भारतीय इलेव्हनमध्ये संधी मिळाली तर तो 100 कसोटी सामने खेळणारा 11वा तर, कपिल देव यांच्यानंतर दुसराच भारतीय वेगवान गोलंदाज ठरेल. (IND vs ENG 3rd Test 2021: Ishant Sharma पूर्ण करणार कसोटी सामन्यांचे शतक, Kapil Dev नंतर हा कीर्तिमान करणारा बनणार दुसरा वेगवान भारतीय गोलंदाज)

इशांतने वयाच्या 18व्या वर्षी बांग्लादेशविरुद्ध राहुल द्रविडच्या नेतृत्वात कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो अनिल कुंबळे, महेंद्र सिंह धोनी, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळला. कोणता कर्णधार त्याला अधिक चांगल्याप्रकारे समजू शकला या प्रश्नावर वर्च्युअल पत्रकार परिषदेत त्याने म्हटले की, “मला कोण चांगले समजले हे सांगणे कठीण आहे पण सर्व मला चांगले समजत होते. मला कर्णधार किती समजतो या पेक्षा मी कर्णधाराला किती समजतो हे महत्त्वाचे आहे.” व्हाईट बॉल क्रिकेटच्या अभावामुळे त्याच्या टेस्ट कारकिर्दीत वाढ झाली आहे का असे विचारले असता वेगवान गोलंदाजाने म्हटले की, “मला व्हाईट बॉल क्रिकेट खेळायला आवडते, खेळणे खेळाडुचे काम आहे, ते हेच करू शकतात. जर मी व्हाईट बॉल क्रिकेट खेळत नाही तर त्याचा माझ्या कसोटी क्रिकेटवर परिणाम होणार नाही. कसोटीत मी किती सामने खेळले याबद्दल मी कृतज्ञ असले पाहिजे. मी फक्त असा विचार करतो. मला असे वाटत नाही की मी तीनही फॉर्मेट खेळले असते तर मी 100 कसोटी खेळले असते. मी थोडा उशिरा ही कामगिरी केली असती, पण मी 100 कसोटी सामने खेळले असते.”

दरम्यान, इशांतने आजवर 99 टेस्ट सामन्यात 302 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान, त्याने 11 वेळा एका डावात 5 विकेट्स तसेच 1 वेळा सामन्यात 10 विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. शिवाय, इशांतने 80 वनडे सामन्यात 115 विकेट्स आणि 14 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळत 8 विकेट्स घेतल्या आहेत.