IND vs ENG 3rd Test 2021: 32-वर्षीय इशांत शर्माने (Ishant Sharma) 2007 साली राहुल द्रविडच्या नेतृत्वात बांग्लादेशविरुद्ध (Bangladesh) मीरपूर येथे टेस्ट कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर या भारतीय वेगवान गोलंदाजाने मागे वळून पाहिले नाही आणि आज भारतीय संघाचा हा ‘लम्बू’ गोलंदाज एक मोठा कीर्तिमान करण्याच्या उंबरठ्यावर आहे. इशांतने इंग्लंडविरुद्ध (England) सध्या सुरु असलेल्या मालिकेत विकेटचे तिहेरी शतक पूर्ण केले होते आणि अहमदाबादच्या सरदार पटेल स्टेडियमवर (Sardar Patel Stadium) बुधवारी इंग्लंडविरुद्ध सुरु होणाऱ्या पिंक-बॉल टेस्टमध्ये (Pink Ball Test) तो कसोटी सामन्यांचे शतक पूर्ण करेल. भारतासाठी 100 कसोटी सामने खेळणारा इशांत फक्त दुसरा वेगवान गोलंदाज ठरणार आहे. भारताचा माजी कर्णधार आणि अनुभवी अष्टपैलू कपिल देव (Kapil Dev) यांनी इशांतपूर्वी हा पराक्रम केला आहे. त्यामुळे, इशांत कसोटी सामन्यांचे शतक करणारा भारताचा दुसरा वेगवान गोलंदाज आणि एकूण 11वा क्रिकेटर ठरेल. इशांतने 99 कसोटी सामन्यात 302 विकेट्स घेतल्या आहेत. इशांत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मंद गतीने 300 विकेट्सचा टप्पा गाठणारा गोलंदाज आहे. इशांतने 98 कसोटी सामन्यात ही कामगिरी केली. (IND vs ENG 3rd Test 2021: अहमदाबादच्या जगातील सर्वात मोठा Motera Stadium पाहून स्टुअर्ट ब्रॉड इम्प्रेस, सामन्यापूर्वी दाखवली खास झलक)
कसोटी क्रिकेटमध्ये इशांतच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल बोलायचे तर त्याने 74 धावा देत त्याने सात विकेट घेतल्या आहेत. इशांतने यादरम्यान, 9731 धावा दिल्या असून 11 डावात पाच विकेट घेतल्या आहेत. इंग्लंडविरुद्ध इशांतला डे-नाईट टेस्ट सामन्यात संधी मिळाल्यास तो भारतासाठी 100वा कसोटी सामना खेळणारा 11वा खेळाडू ठरेल. भारताकडून यापूर्वी, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सुनील गावस्कर, व्हीव्हीएस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, दिलीप वेंगसरकर, कपिल देव, अनिल कुंबळे आणि हरभजन सिंह यांनी शेकडो कसोटी सामने खेळले आहेत. दुसरीकडे, दिवस/रात्र कसोटी क्रिकेटमध्ये इशांतने बांग्लादेशविरुद्ध एकमेव सामना खेळला असून त्याने 9 विकेट घेतल्या आहेत. त्या सामन्याच्या पहिल्या डावात इशांतने 22 धावांवर 5 विकेट आणि दुसऱ्या डावात 56 धावा देत 4 विकेट घेतल्या होत्या.
इंग्लंडविरुद्ध इशांतने कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडचा माजी सलामी फलंदाज आणि कर्णधार अॅलिस्टर कुकला कारकिर्दीत सर्वाधिक 11 वेळा बाद केले आहेत. शिवाय, इशांतचे संघात आत-बाहेर होत राहिला.2007 मध्ये टेस्ट डेब्यू करणारा हा वेगवान गोलंदाज खराब फॉर्म आणि दुखापतीमुळे यादरम्यान 45 कसोटी सामने खेळू शकला नाही.