शुभमन गिल (Photo Credits: Twitter/Shubman Gill)

IND vs AUS 2nd Test 2020-21: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) बॉक्सिंग डे टेस्ट (Boxing Day Test) सामन्यात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर युवा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) यांनी टीम इंडियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये डेब्यू केले. 2001 नंतरची तिसऱ्यांदा दोन किंवा अधिक भारतीय खेळाडूंना देशासाठी परदेशी भूमीवर एकाच वेळी पदार्पणाची संधी मिळाली आहे. यापूर्वी वीरेंद्र सेहवाग आणि दीप दास गुप्ता यांनी 2001 मध्ये एकत्र पदार्पण केले होते. याशिवाय 2011 मध्ये विराट कोहली, अभिनव मुकुंद आणि प्रवीण कुमार यांनी एकत्र कसोटी पदार्पण केले होते. आतापर्यंत दोन्ही खेळाडूंच्या क्रिकेट कारकीर्दीबद्दल बोलताना शुभमन गिलने तीन डावांमध्ये देशासाठी तीन डावात 16.3 च्या सरासरीने 49 धावा केल्या आहेत. याखेरीज त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 21 सामन्याच्या 34 डावांमध्ये 73.5 च्या सरासरीने 2133, तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये 59 सामन्याच्या 58 डावात 44.9 च्या सरासरीने 2336 धावा केल्या आहेत. (IND vs AUS 2nd Test 2020: ऑस्ट्रेलियाविरुद्ध 100व्या टेस्ट मॅचसाठी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात, 'या' संघाविरुद्ध खेळले सर्वाधिक कसोटी सामने)

शिवाय, गिलने देशातील प्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगच्या 41 सामन्याच्या 38 डावात 33.5 च्या सरासरीने 939 धावा केल्या आहेत. गिलने आयपीएलमध्ये सात अर्धशतकांची नोंद करत भारताच्या प्रीमियर लीगमध्ये 76 धावांची वैयक्तिक धावांची खेळी केली आहे.  दुसरीकडे, मोहम्मद सिराजने भारताकडून एक आंतरराष्ट्रीय वनडे आणि तीन टी-20 सामने खेळत एकूण तीन विकेट घेतल्या आहेत. वनडेमध्ये सिराजला एकही विकेट मिळाली नाही तर टी-20 मध्ये त्याने तीन गडी बाद केले आहेत. घरगुती क्रिकेटमध्ये सिराजने उत्कृष्ट कामगिरी आहे. त्याने 36 फर्स्ट क्लास क्रिकेट मॅच खेळत 63 डावात 147, लिस्ट ए क्रिकेटमध्ये 46 सामन्याच्या 46 डावात 81 आणि 67 टी-20 सामने खेळत त्याने 66 डावात 90 विकेट घेतल्या आहेत. सिराज सध्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळत असून 35 सामन्यात 39 विकेट्स घेतल्या आहेत.

दरम्यान, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या अ‍ॅडिलेड ओव्हलमधील पहिल्या पिंक-बॉल टेस्ट सामन्यात भारताविरुद्ध 8 विकेटए विजय मिळवत यजमान कांगारू संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा स्थतीत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या सामन्यात आघाडी कायम ठेवू पाहत असेल तर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात बरोबरी करण्याच्या प्रयत्नात असेल.