IND vs AUS 2020-21: भारत-ऑस्ट्रेलिया वनडे, टी-20 मालिकेचा उत्साह शिगेला; 24 तासांत पाच सामन्यांच्या तिकीटांची झाली विक्री
आरोन फिंच आणि विराट कोहली (Photo Credit: Getty)

IND vs AUS 2020-21: ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाच्या (Indian Cricket Team) आगामी व्हाईट बॉल मालिकेसाठी क्रिकेट चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहचला आहे आणि मर्यादित सामन्यांच्या तिकिटांची विक्री होण्याची याचा पुरावा आहे. 27 नोव्हेंबरपासून भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात 3 वनडे आणि नंतर टी-20 मालिका खेळली जाईल. शुक्रवारी तिकिटांची विक्री सुरु केल्यानंतर व्हाईट बॉलच्या सहापैकी पाच सामन्यांसाठी तिकिटे 24 तासांपेक्षा कमी वेळात विकली गेली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी फक्त 2000 जागा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. जगातील कोविड-19 संकटांमुळे 117 दिवसानंतर जुलै महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा आगामी ऑस्ट्रेलिया-भारत मालिकेत प्रेक्षकांना स्टेडियममध्ये बसून सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. इंग्लंडने वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानचे आयोजन केले होते परंतु सर्व सामने रिकाम्या स्टेडियममध्ये खेळले गेले होते. (IND vs AUS 2020-21: ऑस्ट्रेलियात विराट कोहली रेकॉर्ड बुकमध्ये घालणार 5 विक्रमांची भर; तेंडुलकर, पॉन्टिंग, ब्रायन लारा यांना पछाडण्याची रन-मशीनला संधी)

सिडनी क्रिकेट ग्राउंड (Sydney Cricket Ground) येथे चार आणि कॅनबेराच्या (Canberra) मानुका ओव्हल (Manuka Oval) येथे दोन सामन्यांचे तिकिट शुक्रवारी सकाळी सर्वसामान्यांना विक्रीसाठी ठेवले होते. कोविडमुळे स्टेडियममध्ये येऊन सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांच्या संख्येवर लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे एससीजी आणि मानुका ओव्हल मधील सामन्यात स्टेडियमच्या 50 टक्के क्षमतेत प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. 'एससीजी आणि मानुका ओव्हल मधील अनुक्रमे दुसरे व तिसरा एकदिवसीय सामना, तर मनुका ओव्हल टी-20 आणि दोन एससीजी टी-20 सामन्यांच्या तिकिटांची विक्री झाली आहे," क्रिकेट ऑस्ट्रेलियाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले.

मर्यादित षटकांनंतर हे दोन्ही संघ 17 डिसेंबरपासून अ‍ॅडिलेड ओव्हल येथे सुरू होणार्‍या बहुप्रतिक्षित चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळतील. मेलबर्न क्रिकेट मैदान 26 ते 30 डिसेंबर रोजी दुसरा, सिडनी क्रिकेट मैदान 3 ते 7 जानेवारी रोजी तिसरा आणि 15 ते 19 जानेवारी रोजी ब्रिस्बेनच्या गाब्बा येथे मालिकेचा चौथा आणि अंतिम सामना आयोजित केला जाईल. पहिल्या कसोटीनंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली मायदेशी परतणार आहे. ही दोन्ही संघ पहिल्यांदाच गुलाबी-बॉल कसोटी सामन्यात एकमेकांविरुद्ध खेळतील.