मुंबई सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारताविरुद्ध 10 विकेटने विजय, धावांचा पाठलाग करताना आरोन फिंच-डेविड वॉर्नर यांनी नोंदवला सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रम
आरोन फिंच आणि डेविड वॉर्नर (Photo Credit: IANS)

ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium) मधील सामन्यात भारतीय संघाला (Indian Team) पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने 25.4 धावांचे लक्ष्य 37.4 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता गाठले. ऑस्ट्रेलियाने भारताला 10 गडी राखून पराभूत केले. 15 वर्षानंतर वनडे सामन्यात भारताला 10 विकेटने पराभवाला सामोरे जावे लागले आहे. शिवाय, ऑस्ट्रेलियाने भारताला 10 विकेटने पराभूत करण्याचीही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी, 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेने कोलकाता सामन्यात भारताला 10 विकेटने पराभूत केले होते. ऑस्ट्रेलियाच्या विजयात कर्णधार आरोन फिंच (Aaron Finch) आणि डेव्हिड वॉर्नर (David Warner) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वॉर्नरने नाबाद 128 आणि फिंचने नाबाद 110 धावा केल्या. भारताने दिलेले 256 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 37.4 षटकांत एकही विकेट न गमावता पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. (Video: टीम इंडियाविरुद्ध पहिल्या वनडेमध्ये अ‍ॅडम झांपा याने आपल्याच चेंडूवर पकडला विराट कोहली याचा अफलातून कॅच)

दरम्यान, वॉर्नर आणि फिंचने भारताविरुद्ध सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम रचला. यापूर्वी 1997 मध्ये वेस्ट इंडिजच्या शिवनारायण चंद्रपॉल आणि स्टुअर्ट विल्यम्स यांनी 200 धावांची नाबाद भागीदारी केली होती. फिंचने 16 वे तर वॉर्नरने 18 शतक पूर्ण केले. दोघांनी सलग पाचव्यांदा भारताविरुद्ध 50 पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली. यापूर्वी पाकिस्तानचे सईद अन्वर आणि आमिर सोहेल यांनी 1994 ते 1996 दरम्यान सहा वेळा ही कामगिरी बजावली होती.

दुसरीकडे, या सामन्यात वॉर्नर वनडेमध्ये पाच हजार धावा पूर्ण केल्या. सर्वात कमी डावांमध्ये हा आकडा गाठणारा तो चौथा फलंदाज आहे. वॉर्नरने 115 व्या डावात ही कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हाशिम अमला 101, वेस्ट इंडीजचा माजी फलंदाज विव्हियन रिचर्ड्स आणि कोहलीने 114 डावात या कामगिरीची नोंद केली. यजमान भारताकडून शिखर धवन (Shikhar Dhawan) ने सर्वाधिक 74 धावा केल्या, तर मिशेल स्टार्क (Mitchell Starc) याने सर्वाधिक 3, तर पॅट कमिन्स (Pat Cummins) आणि केन रिचर्डसन (Kane Richardson) यांनी  प्रत्येकी दोन गडी बाद केले. केएल राहुल याने 47 धावा केल्या.