India National Cricket Team vs Ausralia Men's National Cricket Team: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना 06 डिसेंबरपासून ॲडलेड येथील ॲडलेड ओव्हलवर खेळवला जाणार आहे. हा पिंक बाॅल कसोटी सामना असेल, ज्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा पुनरागमन करेल. पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराहने टीम इंडियाची कमान सांभाळली. रोहित शर्माच्या जागी केएल राहुलने यशस्वी जयस्वालसह सलामीची जबाबदारी स्वीकारली. अशा स्थितीत ॲडलेड कसोटीपूर्वी हा प्रश्न चाहत्यांना सतावत होता की रोहित शर्मा ओपनिंगमध्ये परतणार की केएल राहुल आपले स्थान कायम ठेवणार? आता स्वतः कर्णधार रोहित शर्माने या प्रश्नाचे उत्तर देताना पुष्टी केली आहे.
केएल राहुल करणार ओपनिंग
ॲडलेड कसोटीपूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली, ज्यात त्याने सांगितले केएल राहुल डावाची सुरुवात करेल आणि मी मधल्या फळीत फलंदाजी करेन. केएलने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ते शानदार होते. मला वाटत नाही की कोणतेही बदल आवश्यक आहेत. भविष्यात गोष्टी वेगळ्या असू शकतात. पण राहुल ज्या प्रकारे परदेशी खेळपट्ट्यांवर फलंदाजी करतो, तो यावेळी त्या जागेला पात्र आहे. (हे देखील वाचा: IND vs AUS 2nd Test 2024 Pitch Report: वेगवान गोलंदाज की फिरकीपटू, ॲडलेडमध्ये कोण गाजवणार वर्चस्व? गुलाबी चेंडूच्या कसोटीसाठी कशी असणार खेळपट्टी? येथे घ्या जाणून)
"I'll bat somewhere in the middle"
Captain Rohit Sharma confirms India will continue with the opening pair of KL Rahul and Yashasvi Jaiswal for the Adelaide day-night Test #AUSvIND pic.twitter.com/USpJsjHi9T— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 5, 2024
रोहित शर्मा पाच किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो
राहुलने सलामी दिल्यास रोहित शर्मा पाच आणि सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. ही भूमिका त्याच्यासाठी नवीन नाही. सहाव्या क्रमांकावर असलेली त्याची कामगिरीही उत्कृष्ट ठरली आहे. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना रोहित शर्माने 54.57 च्या सरासरीने 1037 धावा केल्या आहेत ज्यात तीन शतके आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे. रोहित शर्माने 2019 पासून सलामीला सुरुवात केली. या काळात त्याने 64 डावांत नऊ शतकांसह 2685 धावा केल्या. सध्या तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांनी पर्थमध्ये केली आश्चर्यकारक कामगिरी
पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांनी शानदार सलामी भागीदारी केली. टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात राहुल आणि जैस्वाल यांनी 201 धावांची भागीदारी केली होती. या भागीदारीच्या जोरावर संघाने 487/6 धावा ठोकून डाव घोषित केला. केएल राहुलने 5 चौकारांच्या मदतीने 77 धावांची खेळी केली. तर जैस्वालने 15 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 161 धावा केल्या होत्या.