ICC World Test Championship: आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 'या' 5 फलंदाजांनी केल्या सर्वाधिक धावा, यादीत भारतीय देखील शामिल
स्टिव्ह स्मिथ (Photo Credit: Twitter/cricketcomau)

ICC World Test Championship Most Runs: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघात सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिका खेळली जात आहे. ही मालिका आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship) अंतर्गत खेळली जात आहे. आयसीसीने (ICC0 2019 अ‍ॅशेस मालिकेपासून कसोटी चॅम्पियनशिपची सुरुवात केली. 2021 जून महिन्यात इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर गुणतालिकेतील पहिल्या दोन संघात चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जाईल. टेस्ट चॅम्पियनशिपच्या सुरुवातीपासून अनेक खेळाडूंनी बॅट आणि बॉलने प्रभावी कामगिरी बजावली आहे. इंग्लंड-ऑस्ट्रेलिया कसोटी सामान्यापासून सुरु झालेल्या या चॅम्पियनशिपच्या सर्वाधिक धावा आणि विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत क्रिकेटच्या या बलाढ्य संघाच्या खेळाडूंनी वर्चस्व कायम ठेवले आहे. आज आपण जाणून घेणार आहोत या चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 फलंदाजांबद्दल. (IND vs AUS 3rd Test Day 4: स्टिव्ह स्मिथ-लाबूशेनच्या दमदार अर्धशकाने टीम इंडिया बॅकफूटवर, दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची 276 धावांची आघाडी)

विशेष म्हणजे, या यादीत पहिले दोन स्थान ऑस्ट्रेलियन  मिळवले तर एकच भारतीय फलंदाज टॉप-5 मध्ये प्रवेश मिळवू शकला आहे.

1. मार्नस लाबूशेन

या यादीत सर्वात पहिले नाव आहे ते तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन लाबूशेनचे. कांगारू फलंदाजाने आजवर 12 सामन्यात 1542 धावा केल्या आहेत. यामध्ये 4 शतक आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. लाबूशेनची सर्वोत्तम धावसंख्या 215 आहेत.

2. स्टिव्ह स्मिथ

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार या एलिट यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. भारतविरुद्ध सिडनी कसोटीतील शतकी खेळीसह स्मिथने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. हा लेख लिहीपर्यंत स्मिथने 12 सामन्यात 4 शतक आणि 6 अर्धशतकांसह 1227 धावा केल्या आहेत.

3. बेन स्टोक्स 

इंग्लंडचा वर्ल्ड कप विजयाचा नायक स्टोक्सने तिसरे स्थान पटकावले आहे. टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये हजार धावांचा आकडा पार करणारा फक्त तिसरा फलंदाज आहे. स्टोक्सने 13 चॅम्पियनशिप सामने खेळले असून 1131 धावा केल्या आहेत. ज्यात त्याने प्रत्येकी 4 शतक आणि अर्धशतक ठोकले आहेत.

4. अजिंक्य रहाणे

टीम इंडियाच्या कसोटी संघाचा उपकर्णधार रहाणे या यादीत एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे. रहाणेने 3 शतक आणि 5 अर्धशतकी खेळी खरात 12 सामन्यात 918 धावा केल्या आहेत.

5. डेविड वॉर्नर

वॉर्नर या यादीत सामील होणार तिसरा कांगारू फलंदाज आहे. वॉर्नरने 11 सामन्यात 899 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, या चॅम्पियनशिपमध्ये वैयक्तिक त्रिशतकी धावसंख्या गाठणारा वॉर्नरएकमेव फलंदाज आहे. वॉर्नरने पाकिस्तानविरुद्ध 2019 मधील दुसऱ्या कसोटी सामन्यात नाबाद 335 धावा लुटल्या होत्या.

दरम्यान, टीम इंडियासाठी कसोटी चॅम्पियनशिपमध्ये मयंक अग्रवालने दुसऱ्या सर्वाधिक धावा केल्या आहेत. मयंकने 11 सामन्यात 810 धावा केल्या आहेत. एकूणच मयंक या यादीत 8व्या स्थानावर आहे. त्यानंतर विराट कोहलीचा नंबर लागतो ज्याने आजवर 705 धावा केल्या आहेत.