ICC World Cup 2019: इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया च्या पराभवानंतर अब्दुल रझाक यांचे विवादास्पद वक्तव्य, मोहम्मद शमी चे कौतुक करत केला धर्माचा उल्लेख
(Photo Credits: Getty Images)

आयसीसी (ICC) विश्वकपमध्ये रविवारी झालेल्या सामन्यात यजमान इंग्लंड (England) ने विराट कोहली च्या भारतीय संघाचा 31 धावांनी पराभव केला. हा टीम इंडियाचा विश्वकप 2019 मधील पहिला पराभव होता. इंग्लंडच्या विजयाने त्यांच्या सेमीफाइनलमध्ये पोहचण्याचा आशा कायम आहेत. दुरीकडे भारताच्या पराभवानेही पाकिस्तान (Pakistan) ला प्रभावित केले आणि सेमीफाइनलपर्यंत पोहोचण्याचा त्याचा मार्ग अत्यंत कठीण झाला. टीम इंडिया च्या पराभवांनंतर माजी पाकिस्तानी खेळाडू अब्दुल रझाक (Abdul Razzaq) यांनी वादग्रस्त विधान केले आहे. (IND vs ENG मॅचमध्ये बोटातून रक्त निघत होते तरीही टीम इंडिया ला विजय मिळवून देण्याच्या प्रयत्नात होता एम एस धोनी, Netizens ने केली प्रशंसा View Photos)

रझाक यांनी एका पाकिस्तानी चॅनेलवर दिलेल्या आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, 'मोहम्मद शामी (Mohammed Shami) मुस्लिम आहेत, जी चांगली गोष्ट आहे आणि तो मॅचमध्ये सर्वोत्तम प्रयत्न करीत होता." शिवाय रझाक ने भारताच्या गोलंदाजीवरही टीका केली आणि म्हणाला, भारताकडे जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे, तरीही या स्पर्धेत खराब खेळात असलेल्या इंग्लंडचा पराभव करू शकले नाही. पुढे तो म्हणाला, एम एस धोनी (MS Dhoni) सारख्या फलंदाजाचे शॉट पाहून वाटले नाही तो जिंकण्याचा प्रयत्न करत होता. पाकिस्तानी पत्रकारा साज सादिक (Saj Sadiq) ने रझाकच्या शमीवरील वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडिया शेअर केले आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहिले, "समजत नाही, जेव्हा आपण भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीचा संदर्भ देतो, तेव्हा आपणास त्यांचा धर्म सांगण्याची गरज का?"

दरम्यान, सध्या एजबस्टन (Edgbaston) च्या मैदानावर भारत (India) विरुद्ध बांग्लादेश (Bangladesh) लढत सुरु आहे. सेमीफायनलच्या दृष्टीने हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास टीम इंडिया सेमीफायनल मध्ये पोहचेल तर बांगलादेशला सेमीफाइनलसाठी आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी आजची मॅच जिंकणे गरजेचे आहे.