IND vs ENG मॅचमध्ये बोटातून रक्त निघत होते तरीही टीम इंडिया ला विजय मिळवून देण्याच्या प्रयत्नात होता एम एस धोनी, Netizens ने केली प्रशंसा (View Photos)
(Photo Credit: Twitter)

आयसीसी (ICC) विश्वकप च्या सेमीफाइनलमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी भारतीय संघाची आज बांग्लादेश (Bangladesh) शी लढत होईल. हा सामना एजबस्टन (Edgbaston) येथे खेळाला जाईल. आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. या सामन्यात विजयानंतर टीम इंडिया सेमीफायनल मध्ये आपले स्थान निश्चित करेल तर बांग्लादेशला आपल्या सेमीफाइनलसाठीच्या आशा कायम ठेवण्यासाठी आजचा सामना जिंकणे महत्वाचा आहे. दरम्यान, या सामन्याआधी टीम इंडिया समोर एक चिंतेची गोष्ट आहे, ती म्हणजे एम एस धोनी (MS Dhoni) ची स्लो खेळी. (India vs Bangladesh Live Cricket Streaming on DD Sports and Prasar Bharati Sports for Free: रेडिओ वर लुटा IND vs BAN मॅच चा LIVE आनंद)

मागील टेंन सामन्यात धोनीच्या संथ खेळीची सोशल मीडियावर आलोचना केली जात आहे. दुसरीकडे, इंग्लंड (England) विरुद्ध मॅचदरम्यान धोनीबद्दल च्या एक गोष्टीकडे नेटिझन्स ने दुर्लक्ष करत त्याच्या स्लो खेळीची टीका केली. धोनी शांत राहिला पण आता चाहत्यांना हे जाणवले आहे की त्याला सामन्यादरम्यान अंगठ्याला दुखापत झाली होती. सध्या, इंटरनेटवर धोनीचा अंगठा चोखून, रक्त थुंकण्याचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले. आणि त्यामुळे चाहते आता त्याची प्रशंसा करत आहे.

यंदाच्या विश्वकपमध्ये धोनीने शेवटच्या षटकांत फटकेबाजी न करता एकेरी-दुहेरी धावा काढल्या असं म्हणत त्याच्यावर टीका करण्यात आली. इंग्लंडविरुद्ध भारताला धावा हव्या असताना धोनी सावध खेळ खेळताना दिसला. मात्र, एकीकडे धोनीच्या संथ खेळीवर टीका होत असताना कर्णधार विराट कोहली ने मात्र त्याची पाठराखण केली आहे.