इंग्लंड (England) मध्ये चालू असलेल्या आयसीसी (ICC) विश्वकप मध्ये आज भारत आणि बांग्लादेश मध्ये सेमीफायनलसाठी लढत होणार आहे. भारत (India) विरुद्ध बांग्लादेश (Bangladesh) मधील सामने एजबस्टन (Edgbaston) येथे खेळाला जाणार आहे. आजचा सामना जिंकल्यास भारत सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो. भारत-बांग्लादेशमधील सामना बघण्यासाठी हजारो प्रेक्षक एजबस्टन ला पोहचले आहे. जे चाहते इंग्लंड ला जाऊन हा सामना बघण्यात असमर्थ आहे ते टीव्ही वर DD Sports वर या सामन्याचा आनंद लुटू शकतात. दरम्यान, देशाचा बहुचर्चित रेडिओ चॅनेल प्रसार भरती स्पोर्ट्स (Prasar Bharti Sports) भारत-बांग्लादेश सामन्याची लाइव कमेंट्री करणार आहे. आपण प्रसार भारती च्या FM 106.40 मेगाहर्ट्ज वर जाऊन या सामन्याची कॉमेंटरी ऐकू शकतात. (IND vs ENG, ICC World Cup 2019: इंग्लंड कडून टीम इंडिया पराभूत; जाणून घ्या पाकिस्तान, बांग्लादेश कसे पोहचू शकतात सेमीफायनलमध्ये)
हा भारताचा विश्वकपमधील आठवा सामना आहे. टीम इंडिया ने पाच सामन्यात विजय मिळवला आहे तर न्यूझीलंड (New Zealand) विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. भारतीय संघाला आपल्या मागील सामन्यात इंग्लंड विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. दुरीकडे, बांगलादेशला आपल्या सेमीफाइनलच्या आशा कायम ठेवण्यासाठी आजचा सामना जिंकणे आवश्यक आहे. भारत विरुद्ध पराभव झाल्यास बांगलादेश संघ सेमीफाइनलच्या रेस मधून बाहेर होईल आणि याचा फायदा इंग्लंड आणि पाकिस्तान (Pakistan) संघाला होऊ शकतो.
दरम्यान, भारतीय संघ 7 सामन्यात 11गुणांसह गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानावर आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवल्यास भारताचा संघ 13 गुणांसह सेमीफायनलमध्ये पोहोचेल. भारतीय संघासाठी या सामन्यात बांगलादेशचा अष्ठपैलू खेळाडू शाकिब अल हसन हा धोकादायक ठरू शकतो.