(Photo Credit: AP/PTI Image)

आयसीसी (ICC) विश्वकपच्या भारत (India) विरुद्ध इंग्लंड (England) सामन्यात यजमान संघाने टीम इंडिया चा 31 धावांनी पराभूत केले आहेत. इंग्लंडने दिलेल्या 338 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी 138 धावांची भागिदारी केली. रोहित आणि विराटने टीमला दमदार सुरुवात करून दिली मात्र, मधली फळी पुन्हा गडगडली आणि त्याचा परिणामी भारताला विश्वकपमध्ये पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, आता इंग्लंडविरुद्ध पराभवाचा परिणाम पाकिस्तान (Pakistan) आणि बांग्लादेश (Bnagladesh) संघावर होणार आहे. (IND vs ENG, ICC World Cup 2019: रोमहर्षक सामन्यात इंग्लंड कडून टीम इंडिया पराभूत, इंग्लंडचा 31 धावांनी विजय; धोनी ची संथ खेळी)

विश्वकपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेशासाठी आव्हान कायम ठेवण्यासाठी इंग्लंडला आजची मॅच जिंकणं गरजेचं आहे. मात्र, भारताच्या या पराभवामुळे सेमीफायनल मधील चित्र काहीसे बदलले आहे. इथे पहा:

भारताची शक्यता

टीम इंडियाचे दोन सामने बाकी आहे त्यामुळे त्यांना सेमीफायनल गाठणे सोप्पे दिसत आहे. भारताचा पुढील सामना 2 जुलै ला बांग्लादेश शी आणि 6 जुलै ला श्रीलंका (Sri Lanka) शी होणार आहे. सध्या भारत गुणतालिकेत 7 सामन्यांतून 11 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण जर भारताने आपले शिल्लक 3 सामने गमावले तर संघाला सेमीफाइनलमध्ये जाण्यासाठी नेट रन रेटवर अवलंबून राहावे लागणार आहे.

इंग्लंडची शक्यता

भारत विरुद्ध विजयाने इंग्लंडला मोठा फायदा झाला आहे. यजमान संघाला आता आपला शिल्लक एक सामना जिंकायचा आहे सेमीफाइनलमध्ये आपली जागा निश्चित करण्यासाठी. मात्र, हे करणे त्यांना सोप्पे नसणार कारण त्यांचा सामना न्यूझीलंड (New Zealand) शी होणार आहे.

न्यूझीलंडची शक्यता

न्यूझीलंड च सेमीफानला गाठणे पक्के आहे. न्यूझीलंड संघ गुणतालिकेत 8 सामन्यांतून 11 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्लॅक कॅप्स ना सेमीफायनल गाठण्यासाठी 3 जुलै रोजी इंग्लंड सामन्याविरुद्ध सामन्याची वाट बघावी लागणार आहे. न्यूझीलंड संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र, जर टीमचा इंग्लंडविरुद्ध मोठ्या फरकाने पराभव झाल्यास ते बाहेर पडण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानची शक्यता

इंग्लंड च्या पराभवाने सर्वात मोठा फायदा होणार होता तो पाकिस्तानी संघाला. जर इंग्लंड पराभूत झाला असता तर, पाकिस्तानने सहज सेमीफायनल गाठले असते. पण आता पाकिस्तानवर विश्वकपमधून बाहेर पडण्याची नामुष्की आली आहे. आगामी सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडला हरवले तर पाकिस्तान बाहेर पडू शकतो. म्हणून त्यांनी आपल्या पुढील सामन्यात बांग्लादेशचा पराभव करणे आवश्यक आहे शिवाय, न्यूझीलंड ने देखी इंग्लंडला नामावणे गरजेचे आहे.

बांग्लादेशची शक्यता

इंग्लंडच्या विजयाचा मोठा फटका बांगलादेशला लागला आहे. आता उपांत्य फेरीत जाण्यासाठी बांगलादेशला पाकिस्तान आणि भारत यांना हरवणे जरूरी आहे. दरम्यान, बांग्लादेशने पुढील दोन सामन्यात जिंकले तरीदेखील त्यांना इंग्लंडपेक्षा जास्त गुण मिळवणे शक्य नाही.