ICC ODI Ranking: विराट कोहली, रोहित शर्मा यांचे पहिल्या दोन स्थानी वर्चस्व कायम; शाकिब अल हसन याच्यावरील बंदीनंतर बेन स्टोक्स No 1 अष्टपैलू
रोहित शर्मा, विराट कोहली (Photo Credit: Getty Images)

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांनी आयसीसी वनडे क्रमवारीत वर्चस्व कायम ठेवले आहेत. अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडीज यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली गेली. विंडीज संघाने मालिकेतील उत्कृष्ट खेळ दाखवून तिन्ही सामने जिंकले आणि अफघानिस्तानचा 3-0 असा क्लीन-स्वीप केला. 2014 नंतर पहिल्यांदा वेस्ट इंडीजने वनडे मालिका जिंकली. यानंतर आयसीसीने या अनेक क्रमवारी जाहीर केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जाहीर केलेल्या वनडे क्रमवारीत विराट फलंदाजीच्या तर गोलंदाजी क्रमवारीत बुमराह पहिल्या स्थानावर आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या क्रमवारीत अव्वल स्थानी कोणताही बदल झालेला नाही. वनडे क्रमवारीत भारतीय फलंदाज विराट पहिल्या स्थानावर आहे. दुसर्‍या क्रमांकावर उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आहे. पाकिस्तानचा नवीन कर्णधार बाबर आझम (Babar Azam) तिसर्‍या क्रमांकावर आहेत.

विराटचे 895 गुण आहेत तर रोहित 863 गुणांसह 32 गुण मागे आहे. पाकिस्तानचा नवीन टी-20 कर्णधार बाबर आझम 834 गुणांसह तिसरे स्थान कायम ठेवले आहेत. दुसरीकडे, गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा वेगवान गोलंदाज बुमराहने 797 गुणांसह पहिले स्थान कायम ठेवले आहेत. न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट 740 गुणांसह दुसर्‍या स्थानावर आहे तर अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज मुजीब उल रहमान 707 गुणांसह तिसर्‍या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान याच्यासाठी वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका काही खास नव्हती ज्यामुळे रँकिंगमध्ये त्याची दोन स्थानांची घसरण झाली आहे आणि तो पहिल्या दहाच्या बाहेर पडला आहे. तो 9 व्या स्थानावरून 11 व्या स्थानावर, तर लोकी फर्ग्युसन दहाव्या स्थानावर आला आहे.

बांग्लादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याच्यावर आयसीसीने दोन बंदी घातली आहे. या कारणास्तव तो रँकिंगमधून बाहेर पडला असून इंग्लंडचा बेन स्टोक्स (Ben Stokes) हा अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी दुसर्‍या आणि रशीद 5 व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा इमाद वसीम तिसर्‍या आणि इंग्लंडचा क्रिस वोक्स चौथ्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाचा हार्दिक पंड्या (Hardik Pandya) पहिल्या 10 खेळाडूंमधील एकमेव भारतीय आहे. पंड्या दहाव्या क्रमांकावर आहे, तर केदार जाधव 16 व्या आणि रवींद्र जडेजा 17 व्या क्रमांकावर आहेत.