प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

India Squad for ICC Cricket World Cup 2019 Announced: क्रिकेटमधील सर्वात महत्वाचा रणसंग्राम म्हणून ओळख असणाऱ्या विश्च चषकाची सर्व क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत असतात. तर यंदाचा विश्व चषकाचा सामना इंग्लड येथे खेळवण्यात येणार आहे. मात्र क्रिकेट प्रेमींचे लक्ष भारतीय संघाकडे लागले असून संघात कोणत्या खेळाडूंची वर्णी लागणार ह्याची वाट पाहत आहे. आयसीसीने आज त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीसह विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्री यांच्या उपस्थित एक बैठक पार पडली आहे. या बैठकीत भारतीय संघात विश्व चषकासाठी कोणत्या खेळाडूंना स्थान देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विराट कोहली संघाचे नेतृत्व करणार आहे. मात्र आयसीसी विश्च चषक खेळण्यासाठी अंबाती रायडू ह्याला संघात स्थान दिले नाही. केएल राहुल ह्याला बॅकअप ओपनर म्हणून संघात स्थान मिळाले आहे. तर वेगवान गोलंदाजपटू म्हणून जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.

संघातील खेळाडूंची नावे:

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), शिखर धवन,  एमएस धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव,भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, केएल राहुल, विजय शंकर आणि मोहम्मद शमी.