ICC Cricket World Cup 2019 Anthem 'Stand By': आयपीएलनंतर आता जगभरात आईसीसी वर्ल्ड कप 2019 (ICC World Cup 2019) चा उत्साह आहे. यंदा वर्ल्ड कपचा हा सोहळा इंग्लंड (England) मध्ये आयोजित करण्यात आला असून 30 मे पासून सुरु होणाऱ्या या वर्ल्ड कपचे ऑफिशियल एंथम रिलिज करण्यात आले आहे. 'स्टँड बाय' (Stand By) असे या गीताचे बोल असून आईसीसीने या गाण्याचा व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन शेअर केला आहे. या गीतात युनाईटेड किंगडम येथील सांस्कृतिक विविधता दाखवण्यात आली आहे. 'लोरिन' ( Loryn) आणि 'रूडिमेंटल' (Rudimental) या बँडच्या सहयोगाने हे एंथम साँग साकारण्यात आलं आहे. (30 मे पासून सुरू होणार क्रिकेटच्या विश्वविजेते पदाची चुरस; PDF स्वरूपात पहा आणि डाऊनलोड करा आईसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019 चं संपूर्ण वेळापत्रक)
वर्ल्ड कपमध्ये खेळल्या जाणाऱ्या सर्व सामन्यात हे एंथम वाजवले जाईल. त्याचबरोबर वर्ल्डकप संबंधित सर्व कार्यक्रमातही हे गाणे आपल्याला ऐकायला मिळेल. एंथमला जगभरातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. (वर्ल्ड कप विजेता संघ होणार मालामाल, टूर्नामेंटच्या इतिहासातील सर्वात मोठी रक्कम- 40 लाख डॉलर्स मिळणार)
Cricket World Cup ट्विट:
🎶 The Official #CWC19 Song is here! 🎶
'Stand By' from @thisisloryn & @Rudimental is out now!https://t.co/6cgKKOOpBY
— Cricket World Cup (@cricketworldcup) May 17, 2019
पहा व्हिडिओ:
वर्ल्ड कपमधील पहिला सामना इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका संघात केंनिंगटन ओवल मैदानात होणार आहे. तर भारताचा पहिला सामना 5 जून रोजी साऊथ आफ्रीकेविरुद्ध रंगणार आहे. तर 14 जुलैला लॉर्ड्स मैदानावर वर्ल्ड कपमधील अंतिम सामना पार पडेल. यंदा भारताकडून सौरव गांगुली, संजय मांजरेकर आणि हर्षा भोगले कॉमेंट्री करताना दिसतील.