
ICC World Cup 2019 Schedule: आयसीसी वर्ल्ड कप 2019 यंदा 30 मे ते 14 जुलै या दिवसात खेळला जाणार आहे. या वर्ल्डकपमध्ये भारतासह जगभरातील दहा संघ इंग्लंड आणि वॉल्समध्ये यंदा वर्ल्डकप 2019 साठी क्रिकेटच्या मैदानात एकमेकांशी भिडणार आहेत. विराट कोहलीच्या कर्णधारपदाखाली खेळला जाणारा भारतीय संघ प्रबळ दावेदार मानला जात आहे. भारतामध्ये क्रिकेट हा धर्म समजला जातो. मग अशा क्रिकेटवेड्यांसाठी ICC World Cup 2019 चे खास PDF स्वरूपातील वेळापत्रक पहा आणि डाऊनलोड करून ठेवा. आयसीसी वर्ल्डकप 2019 चे जगभरातील दहाही संघाचे संपूर्ण वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ICC World Cup 2019 चे भारतीय संघाचे संपूर्ण वेळापत्रक
- 5 जून- भारत विरूद्ध दक्षिण अफ्रिका, रोज बॉल, साउथॅंप्टन
- 9 जून- भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया, ओव्हल, लंडन
- 13 जून- भारत विरूद्ध न्यूझिलंड, ट्रेंटब्रीज, नॉटिंगहॅम
- 16 जून- भारत विरूद्ध पाकिस्तान, ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
- 22जून- भारत विरूद्ध अफगाणिस्तान, रोज बॉल, साउथॅंप्टन
- 27 जून- भारत विरूद्ध विंडिज, ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
- 30 जून- भारत विरूद्ध इंग्लड, एजबस्टन, बर्मिंगहॅम
- 02 जुलै- भारत विरूद्ध बांग्लादेश, एजबस्टन, बर्मिंगहॅम
- 06 जुलै- भारत विरूद्ध श्रीलंका, हेडिंगले, लीड्स
- 09 जुलै- पहिला उपांत्य सामना, ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
- 11 जुलै- दुसरा उपांत्य सामना, एजबस्टन, बर्मिंगहॅम
- 14 जुलै – अंतिम सामना, लॉर्डस
भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1.30 वाजल्यापासून सामन्यांना सुरूवात होणार आहे.
आयसीसी वर्ल्डकप 2019 साठी 15 भारतीय खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. भारताचा पहिला सामना 5 जून दिवशी साऊथ आफ्रिका संघासोबत होणार आहे. आज पहिल्या सामन्यापूर्वी दहाही क्रिकेट संघाच्या कर्णधारांनी लंडनची महाराणी एलिझाबेथची भेट घेतली. याप्रसंगी प्रिंस हॅरीदेखील उपस्थित होता.