ICC (Photo Credit - X)

बांगलादेशातील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने आता मोठा निर्णय घेतला आहे. ICC ने महिला T20 विश्वचषक 2024 चे ठिकाण बदलले आहे. आता ही स्पर्धा बांगलादेशऐवजी यूएईमध्ये खेळवली जाणार आहे. 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान होणारा हा कार्यक्रम आता दुबई आणि शारजाह येथे होणार आहे. या महिला T20 विश्वचषक 2024 सामने भारतात व्हावे यासाठी आधी आयसीसीने BCCI सचिव जय शाह यांना विचारणा केली होती. परंतू बिसीसीआयकडून या गोष्टी असमर्थता दर्शवल्यानंतर आता ICC ने हे सामने युएईला नेले आहेत. (हेही वाचा - Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये कशी होणार? जेव्हा स्टेडियमची दुर्दशा पाहून पीसीबी प्रमुखच झाले निराश)

पाहा पोस्ट

"बांग्लादेशमध्ये महिला टी-२० विश्वचषकाचे आयोजन न करणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे कारण बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) एक संस्मरणीय कार्यक्रम दिला असता," असे आयसीसीचे मुख्य कार्यकारी ज्योफ अल्लार्डिस यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

ज्योफ अल्लार्डिस म्हणाले, "हा कार्यक्रम बांगलादेशमध्ये आयोजित करण्यासाठी सर्व मार्ग शोधून काढल्याबद्दल मी बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या संघाचे आभार मानू इच्छितो. तथापि, ते होस्टिंगचे अधिकार राखतील. आम्ही या स्पर्धेचे आयोजन करू. नजीकच्या भविष्यात." आयसीसीची जागतिक स्पर्धा बांगलादेशात नेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत."