KKR Vs RCB (Photo Credit: Twitter)

KKR Vs RCB, IPL 2021: कोलकाता नाईट राईडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Kolkata Knight Riders Vs Royal Challengers Bangalore) यांच्यात आज (20 सप्टेंबर) आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील 31वा सामना खेळला जाणार आहे. यूएईच्या (UAE) शेख जायद स्टेडिअमवर (Sheikh Zayed Stadium) हा सामना खेळला जाणार आहे. कोलकाता नाईट राईडर्सच्या संघाचे नेतृत्व इयॉन मॉर्गन करत आहे. तर, विराट कोहलीने कर्णधार पद सोडण्याचे निर्णय घेतल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची जबाबदारी कोणाकडे सोपण्यात येते? हे काही वेळातच स्पष्ट होईल. दरम्यान, कोरोना निर्बंधांखाली आयपीएलचे 14 वे हंगाम पार पडत आहे. अशास्थितीत लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंगसाठी Disney+ Hotstar हा प्रेक्षकांसाठी एक उत्तम पर्याय ठरणार आहे.

Disney+ Hotstar यंदा देखील आयपीएलचे स्ट्रीमिंग पार्टनर आहे. कोलकाता आणि बेंगलोर यांच्यातील आयपीएलचा 31 वा सामना लाईव्ह प्रसारित करणार आहेत. आजचा सामना पाहण्यासाठी आपण आपल्या स्मार्टफोनवर Diseny+ Hotstar डाउनलोड करू शकता. दरम्यान, दोन्ही संघातील आजचा आयपीएलचा सामना लाइव्ह पाहण्यासाठी Android यूजर्ससाठी हॉटस्टार गुगल स्टोअरवर उपलब्ध असेल. तर, Apple मोबाईल यूजर्ससाठी अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध आहे. Disney+Hotstar डाउनलोड करण्यासाठी आपल्याला खालील सोप्प्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. हे देखील वाचा- CSK Vs MI: 'महेंद्र सिंह धोनीने रिव्ह्यू घेतला म्हणजे संपला विषय' मुंबई इंडियन्स विरुद्ध सामन्यात घेतलेल्या डीआरएसची सोशल मीडियावर चर्चा (Watch Video)

1. हॉटस्टार डाउनलोड करणे खूप सोपे आहे. आपल्या प्ले स्टोअर वर जा आणि हॉटस्टार शोधा.

2. मग इन्स्टॉल पर्यायवर जाऊन क्लिक करा आणि आपल्या फोनमध्ये अ‍ॅप इन्स्टॉल करा.

3. आता, आपल्या अ‍ॅप्लिकेशन मेनूमध्ये किंवा होम स्क्रीनवर आपल्याला एक हॉटस्टार अ‍ॅपचे चिन्ह दिसेल.

4. आपण आपल्या जीमेल किंवा फेसबुक अकाउंटने साइन इन करुन अ‍ॅप उघडू शकता किंवा आवश्यक तपशील प्रदान करून साइन अप करू शकता.

5. आता आपण लाईव्ह व्हिडिओ, क्रीडा स्पर्धा जसे की आयपीएल, टीव्ही शो, चित्रपट आणि बरेच काही पाहू शकता.

हॉटस्टार अ‍ॅपद्वारे आपण आजचा सामना लाइव्ह आपल्या मोबाईलवर पाहू शकता. आपण आपल्या फोनवर सहजपणे हा अ‍ॅप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. आयपीएलचे सामने यंदा हॉटस्टार हिंदी, इंग्रजी, बंगाली, तमिळ, पंजाबी आणि मराठी अशा भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे.