CSK Vs MI: 'महेंद्र सिंह धोनीने रिव्ह्यू घेतला म्हणजे संपला विषय' मुंबई इंडियन्स विरुद्ध सामन्यात घेतलेल्या डीआरएसची सोशल मीडियावर चर्चा (Watch Video)
MS Dhoni (Photo Credit: Twitter)

CSK Vs MI, IPL 2021: कोरोनामुळे स्थगित झालेल्या आयपीएल 2021 च्या (IPL 2021) दुसऱ्या टप्प्याला कालपासून सुरुवात झाली आहे. यूएईमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने मुंबई इंडियन्सला (CSK Vs MI) 20 धावांनी पराभूत केले. परंतु, चेन्नईच्या विजयापेक्षा सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा रंगली आहे. ती म्हणजे, या सामन्यात महेंद्र सिंह धोनीने (MS Dhoni) घेतलेल्या डीआरएसची! (DRS) धोनीच्या या निर्णयामुळे पंचानी नाबाद दिलेल्या क्विंटन डी कॉकला तंबूत परतावे लागले. यानंतर सोशल मीडियावर महेंद्रसिंह धोनीने घेतलेल्या डीआरएसची जोरदार चर्चा रंगली आहे.

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जने दिलेल्या 157 धावांचा पाठलाग करीत असताना मुंबईकडून पदार्पणवीर अनमोलप्रीत सिंग आणि क्विंटन डी कॉक सलामी देण्यासाठी मैदानात उतरले. त्यानंतर तिसऱ्या षटकात दिपक चहरचा चेंडू क्विंटन डि कॉकच्या पॅडला आदळला. मात्र, पंचांनी त्याला नाबाद ठरवले. त्यावेळी लगेच महेंद्र सिंह धोनीने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला आणि तो योग्य ठरला. धोनीच्या या निर्णयानंतर अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. धोनी हा डीआरएससंदर्भात अचुक निर्णय घेण्यासाठी ओळखला जातो. हे देखील वाचा- IPL 2021: कोहलीच्या नावे होणार ‘विराट’ रेकॉर्ड, आयपीएलमध्ये ‘असा’ पराक्रम करणारा बनणार RCB कर्णधार पहिलाच ‘द्विशतकवीर’

ट्वीट-

ट्वीट-

ट्वीट-

मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या चेन्नईच्या संघाला ऋतुराज गायकवाडच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर 20 षटकात 6 बाद 156 धावा करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची दमछाक झाली. मुंबईकडून सौरभ तिवारीने सर्वाधिक नाबाद 50 धावांची खेळी केली. पण त्याचे प्रयत्न अपुरे पडले आणि मुंबईच्या संघाला 20 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. ऋतुराजला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत 12 गुणांसह पहिले स्थान मिळवले आहे.