KKR vs RCB IPL 2021 Match 31: आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात, जेव्हा इयन मॉर्गनचा कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विराट कोहलीच्या आरसीबीसमोर असेल, तेव्हा प्रत्येक चाहत्याला एक रोमांचक सामना पाहायला मिळेल. कोलकातासाठी हा सामना जिंकणे खूप महत्वाचे आहे, जे मागील सामन्यातील पराभवाचा बदला घेण्याच्या निर्धाराने मैदानात उतरतील. तर दुसरीकडे, आरसीबी पहिल्या टप्प्यातील आपली विजयी कामगिरी सुरु ठेवू इच्छित असतील. विराट कोहली (Virat Kohli) आता रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) साठी आयपीएलचे (IPL) पहिले विजेतेपद जिंकण्यासाठी उत्साही असेल. विराटसाठी नाईट रायडर्सविरुद्ध आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील हा सामना विशेष ठरणार आहे. कोहली 2008 पासून आरसीबीसाठी (RCB) आयपीएलमध्ये खेळत आहे. आणि आता तो एकाच फ्रँचायझीसाठी टी-20 लीगमध्ये 200 वा सामना खेळणारा पहिला खेळाडू बनणार आहे. (CSK vs MI IPL 2021 Match 30: मैदानात उतरताच Jasprit Bumrah ने लगावले अनोखे ‘शतक’, विराट-पोलार्डच्या क्लबमध्ये केला प्रवेश)
आयपीएलमध्ये दोनशेपेक्षा अधिक सामने खेळण्याचा विक्रम चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीच्या नावावर आहे ज्याने आतापर्यंत एकूण 212 आयपीएल सामने खेळले आहेत. पण त्याने हे सामने चेन्नई सुपर किंग्ज आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स अशा दोन संघासाठी खेळले आहेत. यानंतर यादीत दुसऱ्या स्थानावर मुंबई इंडियन्सचा विद्यमान कर्णधार रोहित शर्मा आहे. रोहितने डेक्कन चार्जर्स आणि मुंबई इंडियासाठी एकूण 207 सामने खेळले आहेत. कोहली सध्या या यादीत दिनेश कार्तिक आणि सुरेश रैना यांच्यानंतर पाचव्या स्थानावर आहे. मात्र एकाच संघासाठी 200 आयपीएल सामने खेळणारा तो इतिहासातील पहिलाच खेळाडू ठरेल. विराटपासून त्याने भारतीय मर्यादित षटकांचा रोहित शर्मा भरपूर मागे आहे. आयपीएलमध्ये फक्त एका फ्रँचायझीचे प्रतिनिधित्व करणारे टॉप 5 खेळाडूंच्या यादीकडे पहिले तर विराटच्या मागे मुंबई इंडियन्सचा तुफानी अष्टपैलू किरोन पोलार्ड आहे ज्याने 2009 पासून मुंबईसाठी एकूण 171 सामने खेळले आहेत. त्यानंतर सुनील नारायण (124), लसिथ मलिंगा (122) आणि जसप्रीत बुमराह (100) यांचा नंबर लागतो.
दरम्यान, मॉर्गनच्या नेतृत्वातील केकेआरसाठी विजेतेपदाचा मार्ग खडतर आहे. कोलकातापुढे युएईच्या पहिल्या सामन्यात मजबूत आरसीबीचा सामना करावा लागेल ज्याचा कर्णधार कोहली मोठी खेळी खेळण्यास उत्सुक असेल. या दोन संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या 27 सामन्यांमध्ये केकेआरने 14 आणि आरसीबीने 13 सामने जिंकले आहेत. पहिल्या लेगच्या सामन्यात आरसीबीने या प्रतिस्पर्ध्याचा 38 धावांनी पराभव केला. त्यामुळे केकेआर पराभवाची भरपाई करू इच्छित असेल.