Indian Women Team T20 Asia Cup 2024: महिला टी-20 आशिया कप 2024 श्रीलंकेच्या भूमीवर होणार आहे. आशिया चषकासाठी भारतीय राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाची घोषणा आधीच करण्यात आली होती. संघाची कमान हरमनप्रीत कौरच्या हाती आहे. उपकर्णधारपदाची जबाबदारी स्मृती मानधनाकडे सोपवण्यात आली आहे. भारतीय संघ 19 जुलै रोजी शेजारील देश पाकिस्तान राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. बांगलादेशमध्ये ऑक्टोबरमध्ये महिला टी-20 विश्वचषक होणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघासाठी आशिया कप महत्त्वाचा बनला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 19 जुलै रोजी पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान, भारतीय संघ, वेळापत्रक आणि स्पर्धेचा इतिहास जाणून घ्या...
आशिया कपसाठी अशी आहे टीम इंडिया
आशिया चषक फक्त टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवला जाईल. आतापर्यंत एकदिवसीय प्रकारात एकूण 4 हंगाम खेळले गेले आणि 4 हंगाम टी-20 मध्ये खेळले गेले. (हे देखील वाचा: IND vs PAK: पुन्हा महामुकाबला… श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारत विरुद्ध पाकिस्तान भिडणार, नोट करुन घ्या तारीख आणि वेळ)
भारतीय महिला संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (विकेटकीपर), उमा छेत्री (विकेटकीपर), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील आणि सजना सजीवन. प्रवास राखीव: श्वेता सेहरावत, सायका इशाक, तनुजा कंवर आणि मेघना सिंग.
टीम इंडिया 19 जुलैला आपल्या मोहिमेला करणार आहे सुरुवात
आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) आशिया चषक स्पर्धेसाठी भारताचा अ गटात समावेश केला आहे. अशा स्थितीत टीम इंडियाचा सामना 19 जुलैला पाकिस्तानशी होणार आहे. यानंतर टीम इंडियाचा पुढचा सामना 21 जुलैला UAE विरुद्ध आणि तिसरा सामना 23 जुलैला नेपाळशी होणार आहे. टीम इंडियाचे ग्रुप स्टेजचे तीनही सामने डंबुलामध्ये खेळवले जातील.
टीम इंडियाच्या नावावर 7 जेतेपद
आशिया कपमध्ये आतापर्यंत टीम इंडियाचा दबदबा पाहायला मिळत आहे. भारतीय महिला संघाने आतापर्यंत 8 पैकी 7 महिला आशिया कप हंगामात विजेतेपद पटकावले आहे. टीम इंडियाने वनडे फॉरमॅटमध्ये 4 वेळा (2004, 2005-06, 2006 आणि 2008) आणि 3 वेळा टी-20 फॉरमॅटमध्ये (2012, 2016 आणि 2022) विजेतेपद पटकावले आहे. गतविजेता म्हणून टीम इंडिया आपले आव्हान सादर करेल. टीम इंडियाने गेल्या मोसमातील अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला होता.
बांगलादेशनेही आशिया कप जिंकला आहे
2018 च्या महिला आशिया चषक टी-20 स्पर्धेचे जेतेपद पटकावण्यापासून वंचित राहिलेल्या टीम इंडियाला अंतिम फेरीत बांगलादेश महिला क्रिकेट संघाकडून पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने नऊ गडी गमावून केवळ 112 धावा केल्या आणि बांगलादेशने 7 विकेट्सने शानदार विजय नोंदवला.
टीम इंडियाच्या या खेळाडूंनी गेल्या मोसमात चांगली कामगिरी केली होती
2022 मध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या टी-20 हंगामात स्टार फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्सने टीम इंडियासाठी सर्वाधिक 217 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये 2 अर्धशतकांचाही समावेश आहे. जेमिमाह रॉड्रिग्सनंतर, शफाली वर्माने 6 डावात 27.66 च्या सरासरीने आणि 122.05 च्या स्ट्राइक रेटने 166 धावा केल्या. या दोघांशिवाय स्मृती मानधनाने 5 डावात 134 धावा केल्या होत्या. गोलंदाजीत दीप्ती शर्माने 7.69 च्या सरासरीने 17 विकेट घेतल्या. दीप्ती शर्माशिवाय राजेश्वरी गायकवाडने 11.77 च्या सरासरीने 9 विकेट घेतल्या.