IND vs PAK (Photo Credit - X)

IND vs PAK, Asia Cup 2024: आशिया कप 2024 मध्ये (Asia Cup 2024) सहभागी होण्यासाठी भारतीय महिला संघ (Indian Women's Cricket Team) श्रीलंकेत (Sri Lanka) पोहोचला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी आशिया कप श्रीलंकेत खेळवला जात आहे. टीम इंडिया 19 जुलैला आशिया कप 2024 मध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना 19 जुलैला पाकिस्तानशी (IND vs PAK) होणार आहे. पुन्हा एकदा टीम इंडियाची कमान हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) हाती आली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये भारत आणि बांगलादेशचे खेळाडू दिसत आहेत. फोटोंमध्ये कॅप्टन हरमनप्रीत कौर, श्रेयंका पाटील आणि जेमिमाह रॉड्रिग्ज विमानतळावरून बाहेर पडताना दिसत आहेत.

आशिया कप 2024 मध्ये टीम इंडियाचे वेळापत्रक

भारत विरुद्ध पाकिस्तान (19 जुलै)

भारत विरुद्ध UAE (21 जुलै)

भारत विरुद्ध नेपाळ (23 जुलै)

टीम इंडियाचा अ गटात समावेश

आशिया कप 2024 साठी भारतीय महिला क्रिकेट संघाला अ गटात ठेवण्यात आले आहे. अ गटात टीम इंडियासोबत पाकिस्तान, नेपाळ आणि यूएईच्या संघांना स्थान देण्यात आले आहे. याशिवाय बांगलादेश, थायलंड, श्रीलंका आणि मलेशिया या संघांना ब गटात ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेत एकूण 15 सामने खेळवले जाणार आहेत. आशिया कप 2024 चा अंतिम सामना 28 जुलै रोजी होणार आहे.

कधी अन् कुठे पाहणार सामना?

महिला आशिया चषक 2024 चे सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केले जातील आणि भारतातील डिस्ने+हॉटस्टारवर प्रसारित केले जातील. (हे देखील वाचा: Team India Squad for Sri Lanka Tour: श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआय आज करू शकते टीम इंडियाची घोषणा, 'या' खेळाडूंना मिळू शकते संधी)

भारताचा संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (विकेटकीपर), उमा छेत्री (विकेटकीपर), स्मृती मानधना (विकेटकीपर), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, जेमिमाह रॉड्रिग्स, रेणुका ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, सजना सजीवन.

पाकिस्तान संघ

निदा दार (कर्णधार), इरम जावेद, सादिया इक्बाल, आलिया रियाझ, डायना बेग, फातिमा सना, गुल फिरोज, मुनिबा अली, सिद्रा अमीन, नाझिहा अल्वी, सय्यदा अरुब शाह, नशरा सुंधू, तस्मिया रुबाब, ओमामा सोहेल, तुबा हसन.