Mahendra Singh Dhoni कसा बनला भारताचा कर्णधार? Sharad Pawar यांनी सांगितली इनसाईड स्टोरी
एमएस धोनी (Photo Credits: Getty Images)

एमएसडी, माही, कॅप्टन कूल, या नावांनी प्रसिद्ध असलेल्या महेंद्र सिंह धोनीचे (Mahendra Singh Dhoni) केवळ भारतातच नव्हेतर संपूर्ण जगभर चाहते आहेत. तसेच धोनीने जागतिक क्रिकेटमध्ये सगळ्याच स्तरावर यश मिळवले आहे. एक वादळ अनपेक्षितपणे यावे आणि सारे काही कवेत घेऊन अचाक गुडूप होऊन जावे, असा धोनीचा प्रवास आहे. परंतु, देशाच्या क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या महेंद्र सिंह धोनीला भारतीय संघाचे कर्णधारपद कसे मिळाले? आयसीसी आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यामागची संपूर्ण हकीकत सांगितली आहे. तसेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांच्यामुळेच भारताला महेंद्र सिंह धोनीसारखा कर्णधार लाभला, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

पुण्यातील एका बोलत असताना शरद पवार यांनी धोनीच्या कर्णधारपदाची इनसाईट स्टोरी सांगितली आहे. शरद पवार म्हणाले की, भारताचा माजी खेळाडू राहुल द्रविड यांनी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. परंतु, यानंतर कर्णधार पदाची जबाबदारी कोणाकडे सोपवायची? याबाबत बीसीसीआयकडून विचार केला जात होता. त्यावेळी सचिन तेंडूलकर यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, सचिन तेंडूलकर यांनीही कर्णधारपदाची जबाबदारी नाकारली आणि महेंद्र सिंह धोनीचे नाव सुचवले. ज्यामुळे आज भारताला नवी ओळख मिळाली आहे, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- मास्टर ब्लास्टर Sachin Tendulkar यांनी मुलगा Arjun Tendulkar सोबत शेअर केला 'हा' खास फोटो

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ 2007 मध्ये टी -20 विश्वचषक, 2008 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये सीबी एकदिवसीय मालिका, 2009 मध्ये कॉम्पॅक कप, 2010 मध्ये आशिया चषक, 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक, 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी, 2013 मध्ये विंडीजमध्ये तिरंगी मालिका आणि 2016 मध्ये भारताला टी -20 आशिया कप ट्रॉफी जिंकून दिली.

डिसेंबर 2004 मध्ये बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय सामन्यांद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या धोनीने आपल्या 16 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक चढउतार पाहिले. त्याने 538 आंतरराष्ट्रीय (350 एकदिवसीय, 90 कसोटी, 98 टी -20) सामने खेळले. या दरम्यान, त्याने एकूण 17266 धावा केल्या, ज्यात वनडे मध्ये 4876 धावा, कसोटीत 10773 आणि टी 20 मध्ये 1617 धावांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याची फलंदाजीची सरासरी 44.96 होती. तर, स्ट्राईक रेट 79.07 होता. यादरम्यान त्याने 16 शतके आणि 108 अर्धशतके केली आहेत.